कोरोना लस घेतल्यानंतर निश्चिंत होऊ नका; काय काळजी घ्यावी लागणार?

टीम ई-सकाळ
Tuesday, 12 January 2021

देशातील कोरोना व्हायरसच्या सद्यपरिस्थितीवर भारत सरकारने पत्रकार परिषदेतून माहिती दिली. यामध्ये कोरोना व्हायरसचे एकूण रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू आणि सक्रीय रुग्णांची आकडेवारीही सादर करण्यात आली.

नवी दिल्ली Covid 19 Vaccine : देशातील कोरोना व्हायरसच्या सद्यपरिस्थितीवर भारत सरकारने पत्रकार परिषदेतून माहिती दिली. यामध्ये कोरोना व्हायरसचे एकूण रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू आणि सक्रीय रुग्णांची आकडेवारीही सादर करण्यात आली. यावेळी देशात कोरोना लशीच्या लसीकरणाबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. जगभरातील कोरोना लशींच्या किंमती, कोरोना लस देण्याची प्रक्रिया आदी गोष्टीही सांगण्यात आल्या.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतात दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशींचा समावेश आहे. दोन्ही व्हॅक्सिन कोरोना व्हायरसपासून संरक्षण देण्यात दोन्ही लशी प्रभावी आणि सुरक्षित ठरल्याचंही सरकारने सांगितलं,

UPDATES -

  • कोरोनाची लस दोन टप्प्यात देण्यात येणार असून २८ दिवसांच्या कालावधीत हे दोन डोस दिले जातील.
  • लस अतिशय सुरक्षित; लस घेतल्यानंतर शरिरात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते.
  • कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधक उपाययोजना बंद करायच्या नाहीत.
  • कोविड लस मिळाल्यानंतर गाफीलपणा चालणार नाही, मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळावेच लागणार
  • लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर, दुसरा डोस  दिला जाईल.
  • लशीचा दुसरा डोस दिल्यानंतर, पुढे 14 दिवसांनंतर त्याचा परिणाम दिसू लागेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: precautions after covid vaccine guidelines