गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सोडलं रेल्वे रुळावर

त्यांनी तिचे तोंड बंद केले व तिला जवळच्या शेतात घेऊन गेले.
rape case
rape case File photo
Updated on

पाटणा: एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार (Pregnant woman gangraped) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडीत महिला पाटना जंक्शनजवळच्या (Patna Junction) रेल्वे रुळावर बेशुद्धावस्थेत (unconscious on a railway track) सापडली. या प्रकरणी एकूण तीन आरोपींविरोधात (Accused) गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे. बिहारच्या पाटना शहरात ही घटना घडली आहे.

शनिवारी रात्री पीडीत महिला फिरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली होती. त्यावेळी त्या परिसरातील दोन युवकांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. त्यांनी तिचे तोंड बंद केले व तिला जवळच्या शेतात घेऊन गेले. त्या दोघांनी तिसऱ्या आरोपीला तिथे बोलावले व तिघांनी मिळून महिलेवर बलात्कार केला.

rape case
डोंबिवली: विद्यार्थिनीच्या वडिलांनी केला शिक्षिकेचा विनयभंग

महिलेने विरोध केल्यानंतर आरोपींनी तिला मारहाण केली. त्यानंतर तिन्ही आरोपी रेल्वे रुळावर तिला बेशुद्धावस्थेत सोडून तिथून पसार झाले. महिलेला शुद्ध आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. त्यानंतर रेल्वे पोलीस तिथे आले. ते पीडीत महिलेला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. पीडीत महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिची जबानी पोलिसांनी नोंदवली आहे. सोमवारी कोर्टात तिची जबानी नोंदवण्यात येईल. सध्या पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत आणि पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
IMD monsoon delay forecast for India 2026
Mamata Banerjee reaction on Abhishek Banerjee attack
Marathi News Esakal
www.esakal.com