हिमवृष्टीत अडकलेल्या गर्भवतीच्या मदतीला धावले जवान

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

श्रीनगर: हिमवृष्टीमुळे रस्त्यात अडकलेल्या गर्भवती महिलेला लष्कराच्या जवानांनी सुखरुपपणे रुग्णालयात दाखल केले अन् तिने जुळ्यांना जन्म दिला. उत्तर काश्मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यात ही घटना घडली असून, मदतीबद्दल महिलेने भारतीय लष्कर व जवानांचे आभार मानले आहेत.

श्रीनगर: हिमवृष्टीमुळे रस्त्यात अडकलेल्या गर्भवती महिलेला लष्कराच्या जवानांनी सुखरुपपणे रुग्णालयात दाखल केले अन् तिने जुळ्यांना जन्म दिला. उत्तर काश्मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यात ही घटना घडली असून, मदतीबद्दल महिलेने भारतीय लष्कर व जवानांचे आभार मानले आहेत.

लष्करी अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी आहे. जोरदार हिमवृष्टीमुळे बांदिपोरातील तापमान उणे सात अंश सेल्सिअस असून, बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक ठप्प होते. बांदिपोरातल्या लष्करी तळावर एका ग्रामस्थाने दुरध्वनी केला. प्रचंड हिमवृष्टी सुरू असल्यामुळे पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी मदत मागितली. महिलेला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. बांदिपोरा राष्ट्रीय रायफल्सचे जवान चालत महिलेच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी महिलेला स्ट्रेचरवर ठेवले आणि अडीच किलोमीटरचं अंतर पायी कापले. यावेळी रस्त्यावर जवळपास कमरेइतका बर्फ साचला होता. महिलेला लष्कराच्या रुग्णवाहिकेतून बांदिपोरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्कर आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे महिला रुग्णालयात दाखल झाली अऩ् तिथे तिने जुळ्यांना जन्म दिला.'

'जोरदार हिमवृष्टीमुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. प्रत्येक क्षण महत्वाचा होता. यावेळी जवान मदतीसाठी धावून आले. जवानांमुळे पत्नी वेळेत रुग्णालयात दाखल होऊ शकली. पत्नी व जुळ्या मुली सुखरूप आहेत. जवानांचे आभार,' अशी प्रतिक्रिया महिलेचा पती व महिलेने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregnant woman stuck in snow delivers twins after Army helps her to hospital in Kashmir