
नवी दिल्लीः वृंदावनचे संत प्रेमानंदजी महाराज सध्या त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी कथावाचक अनिरुद्धाचार्य त्यांच्या वादग्रस्त बोलण्यामुळे सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरले होते. आता प्रेमानंदजी महाराज यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 14 सेकंदांच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रेमानंदजी महाराज असे म्हणताना आजकालच्या तरुणांबद्दल बोलताना दिसत आहेत.