आता विम्याचे हप्ते ठरणार नाही ओझे; मिळणार लोण

Premium Financing Now you will get a loan to pay the insurance premiums
Premium Financing Now you will get a loan to pay the insurance premiumsPremium Financing Now you will get a loan to pay the insurance premiums

नवी दिल्ली : भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा महत्त्वाचा आहे. विमा केवळ अपघाताच्यावेळीच संरक्षण देत नाही तर अचानक आजारी पडल्यास संरक्षण देखील देतो. आयुर्विमा, मुदत विमा, आरोग्य विमा असेल तर भविष्याची चिंता करण्यापासून मुक्त होऊ शकता. इतके फायदे असूनही अनेक जण विमा काढत नाहीत. कारण, त्यांच्याकडे प्रीमियम भरण्यासाठी (EMI) पैसे नसतात. आता विमा नियामक आयआरडीए या समस्येवर मात करण्यासाठी तयारी करीत आहे. (Premium Financing Now you will get a loan to pay the insurance premiums)

अमेरिका व युरोपातील इतर विकसित देशांबद्दल बोलायचे झाले तर तेथे विम्याची बाजारपेठ विस्तृत आहे. परंतु, भारतात कमी उत्पन्नामुळे विमा अजूनही मर्यादित आहे. या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण हे प्रीमियम फायनान्सिंगची (Premium Financing) सुविधा सुरू करण्याचा विचार करीत आहे.

Premium Financing Now you will get a loan to pay the insurance premiums
अग्निवीरांची भरती अन् परीक्षेची तारीख घोषित; जाणून घ्या तपशील

आयआरडीएची (IRDA) योजना आहे की लोकांना एकाच वेळी विम्याचा हप्ता भरण्यासाठी कर्ज मिळेल. नंतर ते हप्त्यांमध्ये भरू शकतील. या सुविधेमुळे भारतातील विम्याची उपलब्धता वाढू शकते आणि मोठ्या संख्येने लोकांना विमा काढतील. तसेच आयआरडीए किरकोळ व कॉर्पोरेट ग्राहकांना विमा खरेदी करण्यासाठी वित्त सुविधा देण्याची तयारी करीत आहे.

दोन्ही प्रकारचे ग्राहक प्रीमियम भरण्यासाठी कर्ज घेऊ शकतात आणि त्याचे हप्ते हळूहळू भरू शकतात. यामुळे त्यांच्यावर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात प्रीमियम भरण्याचा (EMI) भार पडणार नाही. विम्याची (Insurance) उपलब्धता सुधारण्यासाठी तसेच ग्राहक आणि कॉर्पोरेट वित्तपुरवठ्याचे नवीन आयाम उघडण्यासाठी आयआरडीए याच्याशी संबंधित प्रस्तावांवर विचार करीत आहे.

अशी असेल प्रीमियम फायनान्सची व्यवस्था

  • ही व्यवस्था अमलात आल्यास वित्त पुरवठादार विमा कंपनीचे प्रीमियम भरेल.

  • यानंतर ते किरकोळ व कॉर्पोरेट ग्राहकांकडून मासिक हप्त्यांमधून कर्जाचे हप्ते वसूल करेल.

  • ग्राहक कर्जाचे हप्ते फेडण्यास असमर्थ ठरला तर विमा कंपनी प्रो-रेटा आधारावर वित्त प्रदात्याला कर्जाची शिल्लक परत करेल.

हे बदल होतील

भारतात विमा (Insurance) खरेदी करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध नाही. ही प्रणाली लागू झाल्यानंतर विम्याचे नूतनीकरण न करण्याची प्रकरणे कमी होतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंत वगळलेले लोक देखील विमा खरेदी करू शकतील. कारण, त्यांना नवीन नियमांनुसार वर्षाचा प्रीमियम एकाच वेळी भरावा लागणार नाही. तसेच नवीन प्रणालीमुळे विमा परवडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com