दिल्लीत LOCKDOWNची तयारी; आठवडाभर शाळा बंद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM-Arvind-Kejriwal

दिल्लीत LOCKDOWNची तयारी; आठवडाभर शाळा बंद!

sakal_logo
By
सुधीर काकडे

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत सध्या प्रदुषाणाचा प्रश्न भेडसावतो आहे. दिल्लीमध्ये सध्या हवा प्रदुषणाने सर्व मर्यादा ओलांडल्या असून, अनेक भागांत श्वास घेणं कठीण झालं आहे. या परिस्थितीमध्ये आता सरकारने निर्णायक पावलं उचलण्यास सुरूवात केली असून, लॉकडाऊन लावण्याचा देखील सरकार विचार करत आहे. त्यातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीतील सर्व शाळा एक आठवड्यासाठी बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.

दिल्लीच्या शाळा सोमवारपासून ऑनलाइन वर्ग भरवणार असून, सर्व बांधकामं देखील बंद राहणार आहेत. तर सरकारी कार्यालयातील १०० टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करता येणार आहे. खासगी क्षेत्रातील लोकांनाही शक्य तेवढ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला देण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सांगितले, राजधानी आठवडाभरापेक्षा जास्त काळापासून दिल्ली धुक्यांच्या समस्येचा सामना करतेय.

दरम्यान, दिल्लीमधील हवा प्रदुषणाची (Air quality in Delhi) समस्या इतकी तीव्र झाली आहे की, त्यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. वायू प्रदुषणावर तातडीचा उपाय म्हणून काही दिवसांसाठी लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात यावा का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) केंद्र सरकारला केली आहे. AQI ची पातळी दिवसेंदिवस वाढत असून प्रदुषित हवेमध्ये राहणं मुश्किलीचं झालं आहे. एन व्ही रमणा (N V Ramana) यांच्या नेतृत्वाखाली न्यायपीठाने ही विचारणा केली आहे.

loading image
go to top