President Election : भाजप खासदार किरोरीलाल व राजेंद्र राठोडमध्ये शाब्दिक वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

President Election Marathi News

President Election : भाजप खासदार किरोरीलाल, राजेंद्र राठोडमध्ये शाब्दिक वाद

जयपूर : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (President Election) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमात भाजप खासदार किरोरीलाल मिना आणि विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र सिंह राठोड यांच्यात हाणामारी झाली. यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले. राजेंद्र राठोड द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याची सर्व व्यवस्था पाहत आहेत.

कार्यक्रमात कार्यकर्त्यांना प्रवेश न दिल्याने किरोरीलाल संतापले. राजेंद्र राठोड यांनी किरोरीलाल यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. यामुळे भाजपचे (BJP) खासदार किरोरीलाल संतप्त झाले. पक्षाचा एकही बांधील कार्यकर्ता कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचा आरोप किरोरीलाल यांनी केला. राजस्थानमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्याकडे निवडणूक प्रतिनिधीची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगावर लवकरच स्वदेशी लसी; नवी आशा

द्रौपदी मुर्मूसाठी (Draupadi Murmu) हॉटेल क्लार्क आमेर येथे भाजपचे खासदार-आमदार, लोकप्रतिनिधी आणि आदिवासी समाजाच्या नेत्यांसोबत चहापानावर चर्चा केली जात आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी सर्व भाजप खासदार आणि आमदारांना १३ जुलै रोजी मुर्मू यांच्या आगमनापूर्वी जयपूरला पोहोचण्याचे निर्देश दिले आहे.

राजस्थानमध्ये (Rajasthan) भाजपने विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक एजंट बनवले आहे. द्रौपदी मुर्मू भाजप आमदार आणि खासदारांना भेटणार आहेत. यामुळे भाजपच्या खासदार-आमदारांना जयपूरमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राजस्थानमध्ये भाजपचे ७१ आमदार आहेत. राजस्थानमध्ये लोकसभेच्या २५ पैकी २४ जागांवर भाजपचे खासदार आहेत.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी

द्रौपती मुर्मू यांना भाजप आणि त्यांच्या समर्थक पक्षांनी उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मूसोबत भाजप नेत्यांची वाहन रॅली निघणार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक (President Election) १८ जुलै रोजी होणार आहे.

Web Title: President Election Draupadi Murmu Bjp Jaipur Rajasthan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..