
हैदराबाद : ‘‘संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त उपकरणे निर्माण करून या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी पुढचे पाऊल टाकण्याची योग्य वेळ आली आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. कॉलेज आँफ डिफेन्स मॅनेजमेंटमध्ये(सीडीएम) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रपती ध्वजप्रदान कार्यक्रमानिमित्त त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.