Sudha Murty Nominated as MP: सुधा मूर्तींची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती; राष्ट्रपतींनी केलं नॉमिनेटेड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे.
president of india has nominated sudha murty to rajya sabha pm modi x post
president of india has nominated sudha murty to rajya sabha pm modi x post

Sudha Murty Nominated as MP Marathi News : प्रसिद्ध लेखिका सुधा मुर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट करत याची माहिती दिली. सुधा मुर्ती यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत महिला दिनी मोदींनी त्यांना या नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (president of india has nominated sudha murty to rajya sabha pm modi x post)

पंतप्रधानांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांचं नामांकन राज्यसभेसाठी केल्यानं मला आनंद होत आहे. सुधा मूर्ती यांचं सामाजिक कार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात योगदान मोठं आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील मूर्ती यांची उपस्थिती असणं ही आमच्या 'नारी शक्ती'चा एक शक्तिशाली पुरावा आहे. त्यांचा संसदेतील सहभाग हा आपल्या देशाचं नशीब घडवण्यात असलेलं महिलांच्या सामर्थ्याचं उदाहरण आहे. त्यांना संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा" (Latest Marathi News)

president of india has nominated sudha murty to rajya sabha pm modi x post
National Creators Award : कोण आहेत भारताचे बेस्ट इन्फ्लुएन्सर्स? PM मोदींच्या हस्ते गौरव! पहिल्यांदाच देण्यात आले पुरस्कार

कोण आहेत सुधा मूर्ती?

सुधा मूर्ती या लेखिका तर आहेतच पण त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत. इन्फोसिसच्या सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. सन २००६ मध्ये त्यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं आहे. त्या मूळच्या कर्नाटकातील शिगगाव इथल्या आहेत. आयआयएससीमधून त्यांनी एमईपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यांनी आजवर २० विविध विषयांनी पुस्तकं लिहिली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com