सकाळी दिल्ली पोलिसांना फटकारले अन् रात्री केंद्राकडून बदली 

वृत्तसंस्था
Thursday, 27 February 2020

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी या मुद्द्यावरुन दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 29 जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणाऱ्या न्यायाधीशांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारावरून केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांना फटकारणारे दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश एस. मुरलीधर यांची रात्रीतच पंजाबमध्ये बदली करण्यात आली आहे. 

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी या मुद्द्यावरुन दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 29 जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणाऱ्या न्यायाधीशांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांची रातोरात बदली करण्यात आल्याने विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे.

दिल्ली हिंसाचारप्रकरणी बुधवारी उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणी पार पडली. न्यायाधीश एस. मुरलीधर हे या प्रकरणावर न्यायाधीश म्हणून सुनावणी करत होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या एस. मुरलीधर यांची तडकाफडकी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. काल न्यायमूर्ती मुर्लीधर यांनीच कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्यावर तातडीने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. मुरलीधर यांच्या बदलीचे केंद्रीय कायदा मंत्रालयाने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले असून, राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांची चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President orders transfer of Delhi HC judge Muralidhar