esakal | न्या. एन व्ही रामण्णा भारताचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी केली घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

1Justice_Ramana.jpg

विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे हे 23 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. राष्ट्रपती कोविंद हे न्या. रामण्णा यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील.

न्या. एन व्ही रामण्णा भारताचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी केली घोषणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा यांची नियुक्ती केली आहे. न्या. रामण्णा हे 24 एप्रिल रोजी पदभार घेतील. ते सरन्यायाधीश पदावर एक वर्षे 4 महिन्यांपर्यंत कार्यरत राहतील. विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे हे 23 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. राष्ट्रपती कोविंद हे न्या. रामण्णा यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील.

कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 19 मार्चला सरन्यायाधीश बोबडे यांना पत्र लिहून उत्तराधिकाऱी कोण याबाबत माहिती मागवली होती. पुढील सरन्यायाधीश कोण याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. निर्धारित प्रक्रियेनुसार, सुप्रीम कोर्टाचे जे वकील सर्वात वरिष्ठ असतात आणि सर्वोच्च पदासाठी योग्य असतात त्यांनी निवड केली जाते. 

परंपरा अशी आहे की, कायदामंत्री निवृत्त होणाऱ्या सरन्यायाधीशांकडे पुढील सीजेआयबद्दल सल्ला मागतात. या मुद्द्यावरुन पंतप्रधानांसोबत चर्चा होते आणि त्यानंतर राष्ट्रपती नव्या सरन्यायाधीशांची घोषणा करतात. नागपूरमध्ये जन्मलेल्या बोबडे यांनी 18 नोव्हेंबर 2019 मध्ये वयाच्या 63 व्या वर्षी देशाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून पद सांभाळले होते.  

loading image