esakal | नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखलं जाणार जगातलं सर्वात मोठं स्टेडियम
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi stadium

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन गुजरातच्या अहमदाबादमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं.

नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखलं जाणार जगातलं सर्वात मोठं स्टेडियम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदाबाद - जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन गुजरातच्या अहमदाबादमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असेल अशी घोषणा केली. बुधवारी या स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात पिंक बॉल टेस्ट खेळली जाणार आहे. अमित शहांनी घोषणा केली की, आम्ही इथं अशा पद्धतीने सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत की, सहा महिन्यात ऑलिम्पिक, एशियाड आणि कॉमनवेल्थसारख्या स्पर्धांचे आयोजन करता येईल. अहमदाबाद आता स्पोर्ट सिटीच्या नावाने ओळखलं जाईल. 

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वप्न पाहिलं होतं आणि ते आज पूर्ण झालं. नवीन स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं आणि हायटेक असं स्टेडियम आहे. मी नरेंद्र मोदींसोबत बऱ्याच काळापासून काम करत आहे. त्यांनी तरुणांना खेळासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. खेलो इंडिया अंतर्गत व्हीजन गावोगावी पोहोचवलं जात आहे असंही अमित शहा म्हणाले. 

मोटेरा स्टेडियमची क्षमता 1 लाख इतकी आहे. या मैदानावर होणाऱ्या पहिल्या सामन्याला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे याच स्टेडिय़ममध्ये गेल्या वर्षी 24 पेब्रुवारीला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यक्रम झाला होता. मोटेरा स्टेडियममध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा असल्यानं ते वेगळं ठरतं. 

हे वाचा - Ind vs Eng 3rd Test Live : मोठ्या मैदानावर कोण रुबाबदार खेळणार?

काय आहेत वैशिष्ठ्ये

  • जुन्या स्टेडियममध्ये 53 हजार प्रेक्षक बसू शकत होते. आता याची क्षमता 1 लाख इतकी आहे.
  • स्टेडियममध्ये 76 एसी कॉर्पोरेट बॉक्स आहेत. 
  • अहमदाबादमध्ये 63 एकर परिसरात हे स्टेडियम उभारण्यात आलं आहे. 
  • मोटेरा स्टेडियम उभारण्यासाठी जवळपास 700 कोटी रुपयांचा खर्च आला. 
  • मैदानात 11 खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये लाल, काळ्या मातीने तयार केलेल्या खेळपट्ट्यांचा समावेश आहे. 
  • खेळाडूंसाठी खास ड्रेसिंग रुम तयार करण्यात आल्या आहेत. यात जीम आहे. एकाच वेळी चार ड्रेसिंग रूम असलेलं जगातलं हे पहिलं स्टेडियम आहे. 
  • बुधवारी या स्टेडियममध्ये डे नाइट सामना होणार असून यासाठी खास एलईडी लाइट लावण्यात आल्या आहेत. देशातील पहिलं स्टेडियम आहे जिथं डे नाइट सामना एलईडी लाइटमध्ये खेळवण्यात येणार आहे. 
     
loading image
go to top