राष्ट्रपतींनी फेटाळला दयेचा अर्ज 

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावलेल्या जगत राय याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल फेटाळला. कोविंद यांनी फेटाळलेला हा पहिलाच दयेचा अर्ज आहे.
 

नवी दिल्ली - खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावलेल्या जगत राय याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल फेटाळला. कोविंद यांनी फेटाळलेला हा पहिलाच दयेचा अर्ज आहे.

बिहारमध्ये वैशाली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांना गाढ झोपेत असताना जगत रायने जाळून मारले होते. विजेंद्र महोता यांची पत्नी आणि त्यांची पाच अपत्ये अशा सहा जणांचा त्याने खून केला होता. हा प्रकार 2006मध्ये घडला होता. त्या वेळी कोविंद हे बिहारचे राज्यपाल होते. 

Web Title: President Ram Nath Kovind rejects first mercy plea