esakal | रामजन्मभूमी निर्णयावेळी भारतीयांनी परिपक्वता दाखवली : राष्ट्रपती 
sakal

बोलून बातमी शोधा

President Ramnath Kovind Speech before budget session

रामजन्मभूमी निर्णयावेळी भारतीयांनी परिपक्वता दाखवली : राष्ट्रपती 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (ता. 31) सुरू झाले. उद्या (ता. 1) अर्थसंकल्प सादर केला जाईल, त्यापूर्वी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल. त्यापूर्वी अधिवेशन सुरू होण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषण केले. त्यांनी सरकाराच्या सर्व कामांचा आढावा घेतला. तसेच नव्या कायद्यांचे स्वागत करत येत्या दशकात भारताला नव्या उर्जेने गती देऊ असे आश्वासन दिले. 

Budget 2020 : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, बजेटमध्ये दोन मोठ्या घोषणांची शक्यता

येणारं दशकं हे भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी संविधानाला 70 वर्षे पूर्ण झाली. आपण सर्वांनी मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणं गरजेचं आहे. नागरिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी हे सरकार कायमच प्रयत्नशील राहील. 'सबका साथ सबका विकास' हा या सरकारचा मंत्र आहे, त्यामुळे आणखी विधायक कामं या सरकारकडून होतील. तसेच भारताच्या निर्मितीसाठी जनादेश अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही कोविंद यांनी यावेळी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील वर्षातील सर्वात महत्त्वाचे निर्णय म्हणजे जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविणे आणि रामजन्मभूमीचा निर्णय. कलम 370 हटविणे ऐतिहासिक पाऊल होते. तसेच जम्मू काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळे ते मुख्य प्रवाहाशी जोडले गेले. रामजन्मभूमीच्या निर्णयावेळी भारतीयांनी परिपक्वता दाखवली. चर्चा, वादविवाद लोकशाहीला आणखी सशक्त बनवतो, त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर चर्चा होणे महत्त्वाचे आहे, असेही कोविंद यांनी अभिभाषणावेळी सांगितले. 

Budget 2020:स्वातंत्र्यानंतरचं पहिलं बजेट कोणी सादर केलं?

तीन तलाक कायदा, चीटफंड संशोधन कायदा, मोटरवाहन संशोशन कायदा असे महत्त्वाचे कायदे या सरकारने पारित केले. कर्तारपूर साहीब कॉरिडॉर खुला करणे, 8 कोटी नागरिकांना गॅसजोडणी देण्यात आली, 24 कोटी नागरिकांना विमा सुरक्षा देण्यात आली अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचे राष्ट्रपतींनी स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी सरकारला शुभेच्छा दिल्या.