राष्ट्रपती रामनाथ कोविंद घेणार अरूण जेटलींची भेट

वृत्तसंस्था
Friday, 16 August 2019

9 ऑगस्टपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांची भेट घेणार आहेत

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज एम्स रुग्णालयात येणार आहेत.

9 ऑगस्टपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांची भेट घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सरकारमध्ये अरुण जेटली हे केंद्रीय अर्थमंत्री होते. प्रकृतीच्या कारणामुळेच त्यांनी 2019 मध्ये कोणतेही पद नको असल्याचे सांगितले. दरम्यान 9 ऑगस्ट ला त्यांना एम्स रुण्गालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले. आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अरुण जेटली यांची रुग्णालयात भेट घेणार असून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Ramnath Kovind will meet Arun Jaitely at Aiims