

Republic Day Parade 2024 : भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आज साजरा करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे यंदाचे प्रमुख अतिथी आहेत. ते भारताच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्यासोबत ऐतिहासिक अशा बग्गीमध्ये कर्तव्यपथावर दाखल झाले. राष्ट्रपतींची ही बग्गी ऐतिहासिक का आहे? यामध्ये काय खास आहे? जाणून घेऊयात.
राष्ट्रपतींची ही बग्गी ब्रिटिशकालीन आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, तेव्हा सर्व गोष्टींचं वाटप केलं जात होतं. यामध्ये ही बग्गी पाकिस्तानला न मिळता भारताला मिळाली. हे कसं झालं, याची गोष्टही अगदीच रंजक आहे.
दोन्ही देशांमधील वाटपाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले होते. भारताकडून एच. एम. पटेल हे प्रतिनिधी होते, तर पाकिस्तानकडून चौधरी मोहम्मद अली हे प्रतिनिधी होते. बग्गी कोणाला मिळणार यासाठी दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू होता. वाद वाढत चालला तेव्हा राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचे चीफ कमांडेंट यांनी एक शक्कल लढवली
बग्गी कोणाला मिळणार याचा निर्णय कॉईन टॉस करून घ्यायची कल्पना त्यांनी मांडली. दोन्ही प्रतिनिधींनी हे मान्य केलं. हा टॉस बॉडिगार्ड रेजिमेंटचे भारतीय प्रतिनिधी ले. कर्नल ठाकुर गोविंद सिंह आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी याकूब खान यांच्यामध्ये झाला. हा टॉस भारताने जिंकला, आणि बग्गी आपल्याला मिळाली.
राष्ट्रपतींच्या या बग्गीसोबत त्यांचे अंगरक्षक देखील असतात. बग्गीला ओढणारे आणि अंगरक्षकांचे एकूण मिळून 55 घोडे या ताफ्यात सहभागी असतात. यातील सहा घोडे हे बग्गीला ओढतात.
या ताफ्यामधील अंगरक्षकांचा खास युनिफॉर्म असतो. लाल रंगाचे लांब कोट, निळ्या-सोनेरी रंगाची साफा-स्टाईल पगडी, पांढरे हातमोजे अशा प्रकारचा युनिफॉर्म ते घालतात. त्यांच्या पायात नेपोलियन बूट असतात, तसंच त्यांच्या हातात नऊ फूट नऊ इंच मोठे भालेही असतात. तसंच काही सैनिकांकडे म्यानातील तलवार देखील असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.