Presidential Election : पहिल्याच दिवशी ११ उमेदवारांनी केले अर्ज दाखल

Presidential election 11 candidates filed their nominations on the first day
Presidential election 11 candidates filed their nominations on the first dayPresidential election 11 candidates filed their nominations on the first day

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) बुधवारी (ता. १५) पहिल्याच दिवशी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. लालू प्रसाद यादव नावाच्या व्यक्तीचाही नामांकन करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. १८ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेची अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली. देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी उमेदवार २९ जूनपर्यंत अर्ज दाखल करू शकणार आहेत. (Presidential election 11 candidates filed their nominations on the first day)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील सारण येथील लालू प्रसाद यादव नावाच्या व्यक्तीचाही नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. त्याचवेळी एका उमेदवाराचा नामनिर्देशन नाकारण्यात आला. कारण, त्या व्यक्तीने संसदीय मतदारसंघासाठी सध्याच्या मतदार यादीत आपले नाव दर्शविणाऱ्या कागदाची प्रमाणित प्रत जोडली नव्हती.

Presidential election 11 candidates filed their nominations on the first day
शिक्षक आमदार निवडणूक : काँग्रेस शब्द पाळणार का?

बुधवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार हे दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील होते. १८ जुलै रोजी देशाच्या नवीन राष्ट्रपतीची (President) निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये ४,८०९ मतदान होणार आहे. आवश्यकता भासल्यास २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज (nominations) भरण्याची मुदत २९ जूनपर्यंत आहे. ३० जूनपर्यंत छाननी केली जाईल आणि उमेदवार २ जुलैपर्यंत अर्ज परत घेऊ शकतील.

२४ जुलै रोजी मुदत संपत आहे

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. नवीन राष्ट्रपतीला २५ जुलैपर्यंत शपथ घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत २४ जुलैपर्यंत नव्या अध्यक्षाची निवड होणे गरजेचे होते. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताना याची काळजी घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com