Presidential Election 2022: राज्यात २८८ पैकी २८३ आमदार मतदानास पात्र

Presidential Election 2022
Presidential Election 2022Sakal

राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी मुलायमसिंग यादव यांना ‘आयएसआय एजंट’ म्हटल्याचा आरोप करत, प्रगतीशील समाजवादी पक्षाचे (पीएसपी) प्रमुख शिवपाल सिंग यादव म्हणाले, “अशा प्रकारचे आरोप करणाऱ्या उमेदवाराला सपाचे नेते आणि नेताजींना मानणारे कधीही पाठिंबा देणार नाहीत."

राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना केलं मतदान!

राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातचे आमदार कंधल एस. जडेजा आणि ओडिशातील काँग्रेसचे आमदार मोहम्मद मुकीन यांनी एनडीचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मत दिल्याचं स्वतः सांगितलं आहे. दरम्यान, सध्या एनडीचा भाग नसलेल्या विरोधीपक्षातील शिवसेना, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आदींनी एनडीएच्या मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनीही दुसऱ्या उमेदवाराला मत दिल्यानं क्रॉस वोटिंग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आपल्या कारच्या ताफ्यासह राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करायला आले होते. त्याविरोधात भाजपाने तक्रार नोंदवली आहे.

२६६ आमदारांचं मतदान पूर्ण

आत्तापर्यंत २६६ आमदारांनी मतदान केलं आहे. २८८ पैकी २८३ आमदार राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करू शकणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही मतदान केलं आहे. आधी देखील आम्ही प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता आता देखील आमचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

शिंदे गटाला धक्का; एका आमदाराला मतदानाची परवानगी नाही

शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी आमदार मतदान करू शकणार नाहीत. गुन्ह्यात आरोप सिद्ध झाल्याने ते मतदान आरोप करू शकणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत २८८ आमदारांपैकी २८३ आमदार मतदान करतील. एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. तर अनिल देशमुख, नवाब मलिक जेलमध्ये आहेत. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने मतदान करणार नाहीत.

काँग्रेसच्या ४४ पैकी ३८ आमदारांचं मतदान पूर्ण

राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसच्या ४४ पैकी ३८ आमदारांनी मतदान केले. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, अमित देशमुख, सुनील केदार यांचं मतदान अजून शिल्लक आहे. तर राष्ट्रवादीच्या ४७ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे.

आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हेंच्या दालनात शिवसेनेची बैठक सुरु आहे. अजय चौधरी, भास्कर जाधव हेही या बैठकीसाठी उपस्थित आहेत. २० जुलैला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसंदर्भात ही बैठक होत असल्याची माहिती आहे. दरम्यान, शिंदे गटाची बैठकही आज दुपारी होणार आहे.

मनमोहन सिंग व्हीलचेअरवरुन मतदानासाठी दाखल

मतदानासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हेदेखील दाखल झाले आहेत. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते व्हीलचेअरवरुन मतदानासाठी आले. मतदान करण्यासाठीही त्यांना इतरांची मदत घ्यावी लागली.

Manmohan Singh
Manmohan SinghSakal

४१ आमदारांचं मतदान पूर्ण

आत्तापर्यंत ४१ आमदारांनी मतदान केलं आहे. त्यापैकी शिंदे गटातले ३४ आमदार असून सात अपक्ष आमदार आहेत.

लोकशाही वाचवण्यासाठी मला मत द्या - यशवंत सिन्हा

सर्वांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकावा. या निवडणुकीमध्ये व्हीप जारी होत नाही. गुप्त मतदान असतं. त्यामुळे मी सर्व आमदारांना विनंती करतो की लोकशाही वाचवण्यासाठी मला मत द्या, असं आवाहन UPA चे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस विधानभवनात

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हेदेखील मतदानासाठी विधान भवनात दाखल झाले आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही विधानभवनात आलेले आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंचं मतदान पूर्ण

आत्तापर्यंत भाजपाच्या ६४ आमदारांनी मतदान केलं असून दोन अपक्ष उमेदवारांचं मतदान पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मतदान केलं आहे. शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनीही मतदान केलं आहे.

नितीन राऊतांच्या विरोधात तक्रार करणार - बबनराव लोणीकर

नितीन राऊत यांच्या विरोधात मी निवडणूक आयोगात तक्रार करणार. मतदान होणाऱ्या सभागृहात हे अर्धातास आधी कसे गेले? त्यांचं मतदान रद्द करावा, यासाठी मी मागणी करणार. माझं नाव पहिलं असताना नितीन राऊत यांनी नियमांचं उल्लंघन केलं, अशी तक्रार बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.

पक्षमर्यादा झिडकारुन द्रौपदी मुर्मूंना मतदान होणार - आशिष शेलार

एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु यांचा विजय निश्चित आहे. आज रेकॉर्ड ब्रेक समर्थन मिळेल. सर्वपक्षीय मतदान होईल. महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवारास मोठ्या संख्येनं मतदान होईल. तो आणखी एक राजकीय इतिहास ठरेल. मला महाविकास आघाडीचं अस्तित्व दिसत नाही. राज्यसभा, विधानसभा निवडणूकीत काय झालं ते पाहिलं. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.

Presidential Election 2022
पक्षाचे आदेश झुगारून मविआचे आमदार मुर्मू यांना मतदान करतील - शेलार

मोदींनीही बजावला मतदानाचा हक्क

संसदेतही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

भरत गोगावलेंची सूचक प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानुसार, आम्ही कामाला लागलो आहोत. आमच्यासोबत कोण आहे हे सांगायचं नसतं. त्या गोष्टी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाच माहीत, अशी सूचक प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रतोद भरग गोगावले यांनी दिली आहे.

मतदानाला सुरुवात

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून पहिले मतदान नितीन राऊत यांनी तर दुसरे बबनराव लोणीकर यांनी केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटणार; भाजपा नेत्यांचे संकेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्रौपदी मुर्मू यांना २०० मतं मिळतील असं आश्वासन दिलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीची मतं फुटणार अशा चर्चांना सुरुवात झाली. या चर्चांना बळ मिळेल, अशीच विधानं आता भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनात केलेल्या विधानांमधून हेच दिसून येत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची मतं आम्हालाच मिळणार असा दावा भाजपाकडून दिला जातोय. तर काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र हे दावे सातत्याने फेटाळून लावत आहेत.

राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) तर यूपीएकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) मुर्मूंना २०० मतं मिळणार असा विश्वास व्यक्त केलाय. त्यामुळे आता शिंदे काँग्रेस राष्ट्रवादीची मतं फोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपाचे महाराष्ट्रातले नेतेही सातत्याने असेच संकेत देत आहेत. राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत गुप्त मतदान होत आहे. जाणून घ्या या मतदानाचे लाईव्ह अपडेट्स...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com