योगींचा विरोधकांना धक्का; द्रौपदी मुर्मू यांना सपा, बसपासह जनसत्ता दलाचा जाहीर पाठिंबा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांच्या मोर्चेबांधणीला मोठा धक्का दिलाय.
President Election 2022
President Election 2022esakal
Summary

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांच्या मोर्चेबांधणीला मोठा धक्का दिलाय.

President Elections : 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी विरोधकांच्या मोर्चेबांधणीला मोठा धक्का दिलाय. सीएम योगी यांच्या पुढाकारानं काही नेत्यांनी (विरोधी पक्ष) पक्षाच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय.

President Election 2022
अर्जुन खोतकरांची शिवसेना उपनेतेपदी निवड; विजय नाहटा, चौगुलेंची सेनेतून हकालपट्टी

समाजवादी आघाडीत समाविष्ट बहुजन समाज पक्ष (BSP), सुहेल देव भारतीय समाज पक्ष आणि जनसत्ता दल यांनीही NDA उमेदवाराला पाठिंबा दिलाय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त विरोधकांकडूनही पाठिंबा मिळू लागलाय. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार.. ओमप्रकाश राजभर, जनसत्ता दलाचे नेते रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैया, बहुजन समाज पक्षाचे (बसपा) नेते उमाशंकर सिंह आणि सपा आमदार शिवपाल सिंह यादव यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केलाय.

President Election 2022
शपथविधी पार पडताच चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंना भरवला पेढा

विमानतळावर द्रौपदी मुर्मू यांचं भव्य स्वागत

एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू लखनौमध्ये पोहोचल्या. चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, अपना दल (एस) नेते आशिष पटेल आणि निषाद पक्षाचे नेते डॉ. संजय निषाद यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचं भव्य स्वागतही केलं.

President Election 2022
Twitter खरेदी करण्यापासून ते डील संपेपर्यंत नेमकं काय घडलं?

एनडीएच्या उमेदवाराला घटक पक्षांचा पाठिंबा

NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना भाजप, अपना दल (एस), निर्बल भारतीय शोषित हमारा आम दलच्या (निषाद पार्टी) खासदार आणि आमदारांनी पाठिंबा दिलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com