
बिहारचे नितीशकुमार सरकार आता सोशल मीडियावर सरकारची बदनामी करणाऱ्यांना आणि खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांना चाप बसवणार आहे. याबाबत पोलिसांनी पत्रक काढले असून सरकारच्या धोरणाबाबत गैरसमज पसरविणारे आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या व्हायरल केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
पाटणा - बिहारचे नितीशकुमार सरकार आता सोशल मीडियावर सरकारची बदनामी करणाऱ्यांना आणि खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांना चाप बसवणार आहे. याबाबत पोलिसांनी पत्रक काढले असून सरकारच्या धोरणाबाबत गैरसमज पसरविणारे आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या व्हायरल केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक नय हसनेन खान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले की, सरकारच्या धोरणाबाबत भ्रामक बातम्या पसरविल्या जात असून असे प्रकार सायबर गुन्ह्याखाली नोंदले जातील. त्यामुळे नागरिकांनी खोट्या बातम्यांची माहिती पोलिसांकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरच्या माहितीबाबत स्वत: नितीशकुमार फारसे सकारात्मक राहिलेले नाहीत. त्यामुळे आता पोलिस खातेही नितीशकुमार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहत असल्याचे चित्र आहे.
Edited By - Prashant Patil