भारत-चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली- भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पूर्व लडाखच्या गालवाण भागात भारतीय जवानांची चिनी सैन्याबरोबर झडप झाली होती. यात 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध स्फोटक बनले आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
सोमवारी झालेल्या संघर्षानंतर मोदी यांनी मंगळवारी रात्री उशीरापर्यंत संरक्षण दलप्रमुख बिपिन रावत आणि तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत बैठक घेतली. नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विदेशमंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि लष्कर प्रमुख म.म. नरवणे यांची रात्री 10 वाजता बैठक झाली होती. या बैठकीत चीनसोबत उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.
परराष्ट्र मंत्रालयाने सीमेवर झालेल्या संघर्षासाठी चीनला जबाबदार धरले आहे. चीन दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराला धरुन चालला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असं मंत्रालयाने म्हटलं आहे. तसेच भारताने नेहमीच शांततेचा मार्ग अवलंबला आहे. मात्र, आम्ही आमचे रक्षण करण्यासाठी कधी माघे घटणार नाही, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.
चीनने सोमवारी घटलेल्या घटनेसाठी भारताला जबाबदार धरलं आहे. भारतीय सैनिकांनी चिनी सीमा पार केली नसती तर हा संघर्ष झाला नसता. त्यांना सीमेवर घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी आम्हाला बळाचा वापर करावा लागला. मात्र, दोन्ही देशांमधील वाद शांततेच्या मार्गाने सूटावा अशी आमची इच्छा असल्याचं चीनने म्हटलं आहे.
दरम्यान, भारत आणि चीनच्या सैनिकांमधील हिंसक चकमकीमुळे दोन्ही देशातील संबंध अधिक चिघळण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचेही 43 जवान मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. 1975 नंतर पहिल्यांदाच भारत आणि चीनमधील वातावरण इतके उग्र बनले आहे. विशेष म्हणजे सोमवारी झालेल्या संघर्षात एकही गोळी चालवण्यात आली नव्हती, तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.