esakal | पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक उभारा
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक उभारा

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - देशभरात १८ आणि त्यापेक्षा वरील वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे फलक कॅम्पसमध्ये उभारावेत, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठ, महाविद्यालय, तंत्रज्ञान संस्थांना एका आवाहनाद्वारे केली आहे. (Prime Minister Flex UGC University College Notice Vacciantion)

पंतप्रधानांनी दोन आठवड्यापूर्वी २१ जूनपासून देशभरात मोफत लसीकरणाबाबत घोषणा केली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी याबाबत व्हॉटसअपवरुन विविध विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांना काल संदेश पाठवले आणि पंतप्रधानांचे आभार व्यक्त करणारे फलके सोशल मीडियावरील शैक्षणिक संस्थांच्या वेबपेजवर प्रसिद्ध करावेत, असे सांगितले. यादरम्यान महाविद्यालयांना दिलेल्या सूचनाबाबत जैन यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही, मात्र तीन विद्यापीठांना निर्देश मिळाल्याचे संबंधित संस्थेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. यूजीसीच्या संदेशात म्हटले की, माहिती मंत्रालयाचे मान्यताप्राप्त डिझाईन हे हिंदी आणि इंग्रजी भाषेतून उपलब्ध असेल आणि ते सोशल मीडियाला जोडावे.

loading image
go to top