
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता केंद्र सरकारकडून फेब्रुवारी २०२५ च्या अखेरीस पात्र लाभार्थ्यांना वितरित केला जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता वितरित केला जाईल. ते २४ फेब्रुवारी रोजी कृषी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी बिहारला भेट देणार आहेत. त्याच दिवशी, पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करतील.