PM Modi : सर्वांनी ‘मिशन मोड’वर काम करा; पंतप्रधान मोदी यांचा शपथविधीपूर्वी मंत्र्यांना कानमंत्र

शपथविधीपूर्वी नियोजित मंत्र्यांना पंतप्रधान मोदी यांनी सकाळी साडेअकरा वाजता चहापानासाठी लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी बोलविले होते.
Prime Minister Modi brief to ministers before swearing-in work on mission mode 100 days events
Prime Minister Modi brief to ministers before swearing-in work on mission mode 100 days eventsSakal

नवी दिल्ली : ‘‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखविला आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही, याची खबरदारी घेत येत्या १०० दिवसांसाठी आखलेल्या कार्यक्रमाची पूर्तता करण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम करावे,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

शपथविधीपूर्वी नियोजित मंत्र्यांना पंतप्रधान मोदी यांनी सकाळी साडेअकरा वाजता चहापानासाठी लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी बोलविले होते. यावेळी या मंत्र्यांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. यावेळी भाजपचे नेते अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, शिवराज सिंग चौहान, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, जेडीयूचे लल्लन सिंह, शिवसेनेचे प्रताप जाधव, अनुप्रिया पटेल, आदींसह नियोजित मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘‘देशातील जनतेने ‘एनडीए’च्या हाती सलग तिसऱ्यांदा सत्ता सोपविली आहे. गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामाचा हा परिपाक आहे. परंतु तिसऱ्या वर्षात राहिलेले अपुरे काम करण्याचे आव्हान आहे. यासाठी १०० दिवसांत कोणते काम करावयाचे आहे. याचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार प्रत्येक मंत्र्यांनी काम करावे.’’

प्रसारमाध्यमांपासून सांभाळून

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी मंत्र्यांना प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्याचा इशारा मंत्र्यांना दिला. उठसूट कोणत्याही मुद्यांवर प्रतिक्रिया देण्यापासून मंत्र्यांनी दूर राहिले पाहिजे. यासाठी सरकारचे प्रतिनिधी आपली भूमिका बजावतील. परंतु प्रसारमाध्यमांपासून दूर राहणे हे केव्हाही चांगले असते. यामुळे आपण वादापासून दूर राहू,’’ असेही त्यांनी मंत्र्यांना सुचविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com