Mann Ki Baat : प्रजासत्ताक दिनी तिंरग्याच्या झालेल्या अपमानामुळे देश दुखी - PM मोदी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 January 2021

कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही मन की बात होत आहे.

नवी दिल्ली : 26 जानेवारी रोजी भारताच्या तिंरग्याचा झालेला अपमान पाहून देश हादरून  गेला, असं मोदींनी आज मन की बातमध्ये म्हटलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 31 जानेवारी रोजी रेडीओवर 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित केलं. मन की बात कार्यक्रमाचा हा 73 वा भाग होता. सध्या दिल्ली सीमेवर सुरु असणाऱ्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही मन की बात झाली. त्यामुळे पंतप्रधान याविषयी काही बोलतील का, याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. मोदींनी या विषयावर काही सविस्तरपणे आणि थेटपणे भाष्य केलं नाही. मात्र तिरंग्याचा अपमान झालेला पाहून देश दुखी झालं असं विधान केलं.

पुढे पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, या महिन्यात आपण क्रिकेटच्या मैदानातून एक खुशखबर ऐकली. सुरवातीला थोडे धक्के खात भारतीय क्रिकेट संघांने जोरात पुनरागमन करत ऑस्ट्रेलियासोबतची मालिका शानादार रित्या जिंकली. आपल्या संघाने घेतलेले कष्ट आणि सांघिक कार्य प्रोत्साहित करणारे आहे. 

पुढे पंतप्रधान मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा दाखला देत म्हटलं की, 75 वा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे. मी देशातील नागरिकांना तसेच विशेषत: तरुण लेखकांना आवाहन करतो की त्यांनी स्वातंत्र्य लढ्याविषयी, त्यातील नेत्यांविषयी लिहावं. आपापल्या भागातील स्वातंत्र्यलढ्यातील शौर्याच्या किस्स्यांबद्दल पुस्तके लिहावित.

PM मोदी म्हणाले की, आपण लसीकरणाची फक्त सर्वांत मोठी मोहिम चालवत नाहीयोत तर आपण सर्वाधिक जलग गतीने लसीकरण करणारा देश देखील आहोत. 

काही दिवसांपूर्वीच भारतातील महिला पायलट्स सॅन फ्रॅन्सिस्कोमधून बंगलोरला यशस्वी उड्डान केलं. जवळपास 10 हजार किमी चे अंतर पार करुन 225 लोकांना या महिला पायलट्सनी भारतात आणलं. कोणतंही क्षेत्र असो, त्यातील महिलांचा सहभाग लक्षणीयरित्या सातत्याने वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे, असं PM मोदी म्हणाले.

उद्या 1 फेब्रुवारी रोजी सोमवारी संसदेमध्ये देशाचं बजेट देखील सादर केलं जाणार आहे. यातच काँग्रेससहित विरोधी पक्षांनी कृषी कायद्यांसहित इतर अनेक मुद्यांवर आपला विरोध जाहीर केला आहे. विरोधकांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर देखील बहिष्कार टाकला होता. 

हा कार्यक्रम आकाशवाणीवर लाईव्ह ऐकता येईल. तसेच पंतप्रधान मोदींच्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर देखील ऐकता येईल. 

हेही वाचा - राहुल गांधी बनले आचारी, चुलीवर बनवली मशरूम बिर्याणी; Video Viral

आकाशवाणी,  डीडी नॅशनल तसेच नरेंद्र मोदी ऍपवर देखील हे ऐकता येईल. तसेच मोबाईलवर या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी 1922 नंबर मिस कॉल दिल्यावर देखील मन कि बात ऐकता येऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi address Mann Ki Baat 11 am 31 january