भारताप्रती जगभरात एवढी सकारात्मकता याआधी नव्हती; 'आत्मनिर्भर' होण्यासाठी मॅन्यूफॅक्चरिंगवर भर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, येणाऱ्या वर्षांमध्ये 'आत्मनिर्भर भारत'साठी आपल्याला संपूर्ण ताकद पणाला लावायची आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Associated Chambers of Commerce and Industry of India’s (Assocham) च्या स्थापना सप्ताहात व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे 'एसोचेम'च्या सदस्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी रतन टाटा यांना ‘एसोचेम एंटरप्राइज ऑफ दी सेंचुरी अवॉर्ड’ प्रदान केला. रतन टाटा यांनी टाटा समूहाच्या वतीने हा अवार्ड स्विकारला. रतन टाटा यांनी यावेळी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रकारे कोरोना संकटाच्या काळात देशाचे नेतृत्व केले आहे, त्यासाठी आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञ आहोत.

पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या विकासात औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व विषद करताना म्हटलं की, येणाऱ्या वर्षांमध्ये 'आत्मनिर्भर भारत'साठी आपल्याला संपूर्ण ताकद पणाला लावायची आहे. सध्या जग चौथ्या औद्योगित क्रांतीच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहे. नव्या टेक्नोलॉजीच्या रुपात अनेक अडचणी देखील येतील आणि अनेक उपाय देखील येतील. पुढे त्यांनी म्हटलं की, नवा भारत आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत, आपल्या संसाधनांवर विश्वास राखत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करत आहे. आणि या ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी मॅन्यूफॅक्चरिंगवर आमचं सर्व लक्ष आहे. मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत.

भारताच्या यशस्वीतेकडे पाहून जगभरात आज सकारात्मकता आहे. इतकी सकारात्मकता याआधी कधीच नव्हती. ही सकारात्मकता 130 कोटीहून अधिक भारतीयांच्या अभूतपूर्व अशा आत्मविश्वासातून आली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. एसोचेमची स्थापना देशातील सर्व क्षेत्रातील प्रमुख लोकांनी एकत्र येत 1920 मध्ये केली होती. या अंतर्गत 400 हून अधिक चेंबर आणि व्यापर संघ येतात. देशभरात या संघाच्या सदस्यांची संख्या 4.5 लाखांहून अधिक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi in Assocham said increased manufacturing for Atmanirbhar Bharat