PM मोदींच्या हस्ते होणार स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतचं लोकार्पण

भारतीय विद्वान 'आदि शंकराचार्य' यांच्या जन्मस्थळाला भेट देणार आहेत
INS Vikrant
INS Vikrantesakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 सप्टेंबरला कोचित शिपयार्ड लिमिटेड मध्ये देशाती पहिली स्वदेशी विमानवाहक INS विक्रांत चालू करणार आहेत. पंतप्रधान कार्यालायाकडून सांगितले आहे की मोदी हे कार्यक्रमाच्या निमित्ताने 1 आणि 2 सप्टेंबरला कर्नाटक ,केरळ, मध्ये दौरा करणार आहेत. आणि येथील कोचित विमानतळा जवळ कलाडी गावात भारतीय विद्वान 'आदि शंकराचार्य' यांच्या जन्मस्थळाला भेट देणार आहेत.

त्यानंतर मंगलुरू मध्ये सुमारे 3,800 करोड रूपयांच्या योजनेचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पीएमओने म्हटले आहे की मोदी हे आत्मनिर्भरतेचे खंबीर समर्थक आहेत, खास करून धोरणात्मक क्षेत्रांमध्ये. आयएनएस विक्रांत चालू होणे हे एका दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. स्वदेशी बनावटीची ही पहिली विमानवाहू युद्धनौका असेल.

भारतीय नौदलाच्या इन-हाऊस वॉरशिप डिझाईन ब्युरो (WDB) द्वारे डिझाइन केलेले आणि सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कोचीन शिपयार्डने तयार केलेले, विक्रांत हे अत्याधुनिक ऑटोमेशन सुविधांनी तयार केलेले आहे. आणि ते सागरी क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com