esakal | प. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ८० टक्के मतदान, १९१ उमेदवारांचं नशिब EVMमध्ये कैद 
sakal

बोलून बातमी शोधा

EVM voting

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडलं. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार यामध्ये सुमारे ८० टक्क्यांहून अधिक मतदान झालं.

प. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ८० टक्के मतदान, १९१ उमेदवारांचं नशिब EVMमध्ये कैद 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

West Bengal Assembly Election 2021:  पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडलं. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार यामध्ये सुमारे ७९.७९ टक्के मतदान झालं. सकाळी सात वाजल्यापासून ५ जिल्ह्यांमधील ३० जागांसाठी संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात १९१ उमेदवारांचं नशिब EVM मध्ये कैद झालं. मतदान संपल्यानंतर सर्व इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स (EVM) निवडणूक अधिकाऱ्यांकडून सील करण्यात आले. तसेच ती स्ट्रॉंग रुममध्ये सुरक्षित पोहोचवण्यात आली. 

"ममता बॅनर्जी किम जोंग उनसारख्या निर्दयी"; गिरीराज सिंह भडकले!

मतदानादरम्यान दिवसभरात किरकोळ हिंसेच्या घटना समोर आल्या. यामध्ये ३० जागांवर मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी शुक्रवारी रात्री निवडणूक अधिकाऱ्यांसह ईव्हीएम एका केंद्रावर सोडवून परणाऱ्या जवानांच्या गाडीवर चार अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. या हल्ल्यात संबंधित वाहन पूर्णपणे जळून खाक झाले, यातून चालकाने कसाबसा आपला जीव वाचवला. त्यानंतर शनिवारी मतदानला सुरुवात झाल्यानंतर भाजप नेते आणि एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सहकारी राहिलेले आणि आता मुख्य विरोधक बनलेले सुवेंदू अधिकारी यांचे बंधू सुमेंदू अधिकारी यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड तृणमुलच्या स्थानिक वॉर्ड अध्यक्षाने केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

१०९ मतदान केंद्रांवर गोंधळ 

दरम्यान, केंद्रीय बलाच्या जवानांकडून मतदारांवर भाजपला मतदान करण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. तसेच मतदान सुरु झाल्यानंतर काही काळ १०९ मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचं समोर आलं. 

२१ महिलासंह १९१ उमेदवारांचं नशिब ईव्हीएममध्ये कैद

पश्चिम बंगालमधील या पहिल्या टप्प्यात २१ महिलांसह एकूण १९१ उमेदवार रिंगणात होते. प्रमुख उमेदवारांमध्ये तृणमूल काँग्रेसचे अखिल गिरी, बिरबाहा हांसदा, टॉलिवूड अभिनेत्री जून मालिया, खगेंद्रनाथ महतो तसेच भाजपचे उमेदवार रविंद्रनाथ माईती, तपन भुइंया आणि माकपचे पुलिन बिहारी बास्के यांचा समावेश होता.

loading image