PM मोदींच्या भाषणाची सुरवात मराठीतून म्हणाले, 'टेकडीच्या गणपतीला...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi

PM मोदींच्या भाषणाची सुरवात मराठीतून म्हणाले, 'टेकडीच्या गणपतीला...'

आज नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन झाले आहे. सुरुवातीला वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एम्स रुग्णालय, नागनदी प्रदूषण मुक्त करण्यासाठीचा प्रकल्प, मेडिकल कॉलेज यासोबतच चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गाच मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. त्याचबरोबर त्यांनी नागपूर मेट्रो मधून त्यांनी प्रवासही केला. सर्व प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर मोदींची सभा पार पडली. यासभेत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून आणि तेही गणेशाला वंदन करून केली आहे.

नागपूरमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत केली. मोदी म्हणाले की, 'आज संकष्ट चतुर्थीनिमित्त टेकडीच्या गणपती बाप्पाला माझं नमन', मोदींनी असं म्हणताच उपस्थितांमध्ये उत्साह संचारला आणि एकच आवाज घुमला. पंतप्रधान मोदी यांनी आज नागपूरमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले.

हेही वाचा: PM मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण; 75,000 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पणासोबतच नागपूरातील एम्स रुग्णालयाचे राष्ट्रार्पण, नॅशनल इस्टिट्यूट ऑफ वन हेल्थ केंद्र, रक्तसंबंधीत रोगांवरील अनुसंधान केंद्र चंद्रपूर, पेट्रो केमिकल महत्त्वाचे केंद्र-चंद्रपूर, नागपूर नागनदी प्रकल्पाच्या विकास आणि स्वच्छतेचा प्रकल्प, नागपूर मेट्रोच्या फेज एकचे लोकार्पण आणि दुसऱ्या फेजचे भूमिपूजन, नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास प्रकल्प, अजनी येथे 12 हजार हॉर्सपावर क्षमतेच्या रेल्वे इंजिन मेनटेंनस डेपो निर्मिती, रेल्वेच्या कोली नरकेट प्रकल्पाचे उद्घाटन ही सुमारे 75 हजार कोटींच्या 11 विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण केलं आहे.

हेही वाचा: PM Modi in Nagpur: Narendra Modi Nagpur Metro विद्यार्थ्यांसोबत प्रवासाचा आनंद घेतला | Sakal Media

टॅग्स :NagpurNarendra Modi