PM Modi Exclusive: महाराष्ट्रात भाजपाच्या जागा कमी होणार? विरोधकांच्या दाव्यावर मोदींचा षटकार

Loksabha Election Maharashtra: यंदा महाराष्ट्रात भाजप किती जागा जिंकणार याची विरोधकांनी चिंता करू नये. तसेच विरोधक करत असलेला हा दावाही बिनबुडाचा आहे."
PM Modi Exclusive
PM Modi ExclusiveEsakal

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही विजय मिळवण्यासाठी देशभर दौरे करत आहेत. निवडणुकीच्या या धामधुमीत पंतप्रधान मोदी यांनी 'एपी ग्लोबाले' आणि 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी नवी दिल्ली येथे देशातील सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय विषयांवर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच विषयांवर भरभरून बोलले.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत घडलेल्या घडामोडींमुळे भाजपच्या राज्यातील जागा कमी होणार असल्याचा दावा विरोधक सातत्याने करत आहेत. याबाबत विचारले असता, पंतप्रधानांनी मतदार, 2014 आणि 2019 च्या निवडणुका आणि विरोधकांचा दाखला देत सडेतोड उत्तर दिले.

पंतप्रधान म्हणाले, "गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षांची जनतेसोबतची नाळ तुटली आहे. त्यांना विरोधी पक्षांची भूमिकाही व्यवस्थित पार पडता आलेली नाही. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात भाजप किती जागा जिंकणार याची विरोधकांनी चिंता करू नये. तसेत विरोधक करत असलेला हा दावाही बिनबुडाचा आहे."

PM Modi Exclusive
महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

"देशात 2014 नंतर झालेल्या प्रत्येक मोठ्या निवडणुकीत देशातील जनतेने भारतीय जनात पक्षाला साथ दिली आहे. त्यामुळे भाजपच्या यशामागे जनतेचाच हात आहे. आणि याच जनतेच्या ताकदीच्या जोरावर केंद्रातही आमचे सरकार आहे. तसेच इथून पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्येही महाराष्ट्रातील जनता आमच्या मागे उभी राहत मोठ्या संख्येने 'एनडीए'च्या उमेदवारांना विजयी करेल," असे मोदी यांनी स्पष्ट केले.

PM Modi Exclusive
Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली लोकसभेतून माघार, 'या' नेत्यांमध्ये होणार थेट लढत

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, "गेल्या दहा वर्षांपासून विरोधात असलेल्या पक्षांकडे जनतेसाठी कसलाही कार्यक्रम नाही. त्यामुळे ते शहरी नक्षलवाद्यांच्या टोळ्यांसारखे झाले आहेत."

दरम्यान, महाराष्ट्रात यंदाची लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. या पाच टप्प्यांपैकी 2 टप्प्यांतील मतदान झाले असून, तिसऱ्या तप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com