esakal | लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय; PM मोदींचा राज्यांना सल्ला

बोलून बातमी शोधा

narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील जनतेला संबोधित केलं

लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय; PM मोदींचा राज्यांना सल्ला

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात अडीच लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8 वाजून 45 मिनिटाला जनतेला संबोधित केलं.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे--

-लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्यांच्याबद्दल माझी सहवेदना आहे

-आरोग्य कर्मचारी, पोलिस या सर्वांचे कौतुक, त्यांनी दिवसरात्र रुग्णांची सेवा केली

- कठीण परिस्थितीतही आपण धैर्य गमवायला नको, धैर्याने काम केल्यास संकटावर विजय मिळवता येईल

- कोरोना संकटात अनेक राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यासाठी राज्य सरकारांसोबत काम केले जात आहे

- गेल्या काही दिवसांत उचलले पाऊल आणखी मजबूत करु

-जगातील सर्वात स्वस्त लस भारतात

--औद्योगिक क्षेत्रातील मेडिकल ऑक्सिजन पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय

-आपल्या खासगी क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे

-दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिनसोबत जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली

-गरजू लोकांपर्यंत लस पोहचेल यासाठी प्रयत्न केले

- जगातील सर्वाधिक गतीने लसीकरण मोहीत भारतात राबवण्यात आली

-आजपर्यंत 12 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे

-गेल्यावेळी होती ती परिस्थिती खूप वेगळी होती

, त्यावेळी आपल्याकडे कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक साधने नव्हती

- आगोग्य सुविधेमध्ये मोठी वाढ झाली आहे. पीपीई किट मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात आहे, चाचण्या घेतल्या जात आहेत

-सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्वांना कोरोना लस मोफत देण्यात येईल

-सामाजिक संस्था गरिबांसाठी काम करत आहेत. त्यांच्या सेवाभावाला मी नमन करतो

- लोकांना आवाहन करतो, की त्यांनी गरिबांना मदत करावी. सेवा संकल्पाने आपण लढाई जिंकू

देशातील कोरोना स्थिती गंभीर बनताना दिसत आहे. तसेच आरोग्य सेवांची कमतरता असल्याचे चित्र आहे. हॉस्पिटल्ससमोर रांगा लागत आहेत. ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा प्राण जात असल्याच्या बातम्याही ऐकायला मिळत आहेत. अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आलेत. शिवाय अनेक राज्यांमध्ये आठवड्याचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोना स्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्यात 15 दिवसांचा कठोर लॉकडाऊन केला जाण्याची दाट शक्यता आहे.