esakal | बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक; मोदी सरकार कोणते निर्णय घेणार?
sakal

बोलून बातमी शोधा

नरेंद्र मोदी

बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक; मोदी सरकार कोणते निर्णय घेणार?

sakal_logo
By
नामदेव कुंभार

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराने मोदी सरकारची प्रतिमा किती उजळणार आहे, हे येत्या काही महिन्यात दिसून येईल. परंतु, या विस्तारात 77 पैकी 36 नव्या चेहऱ्यांचा समावेश केल्यामुळे व त्यात बहुतेक तरूणांचा समावेश केल्याने मंत्रिमंडळाला उमदे स्वरूप आले आहे. 36 नव्या मंत्र्यापैकी आठ कॅबिनेटस्तरीय व 28 राज्यस्तरीय मंत्री आहेत. नव्या आणि जुन्या मंत्र्यांची बुधवारी 14 जुलै 2021 रोजी बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. ANI वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे.

या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, नवीन मंत्रिमंळाने कामकाज स्वीकारल्यानंतर ही पहिलीच बैठक असेल. सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार, या बैठकीत प्रामुख्यानं कोरोना परिस्थितीचा आढावा, हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. त्याशिवाय पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीची तयारी.. यावर चर्चा होऊ शकते.

loading image