PM मोदींकडून e-RUPIचे लॉन्चिंग; जाणून घ्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे 10 फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म e-RUPI चे आज दुपारी चार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लॉन्चिंग करणार आहेत.

PM मोदींकडून e-RUPIचे लॉन्चिंग; डिजिटल प्लॅटफॉर्मचे 10 फायदे

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म e-RUPI चे आज दुपारी चार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लॉन्चिंग करणार आहेत. हे प्लॅटफॉर्म नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाने National Payments Corporation of India वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मदतीने तयार केले आहे. व्यक्तीच्या गरजा लक्षात घेऊन डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. (Prime Minister Narendra Modi will launch a digital payment platform called e RUPI benefits new digital payment platform)

प्लॅटफॉर्म क्रांतिकारी ठरणार असून यामुळे कल्याणकारी सेवांचा थेट लाभ मिळण्यास मदत होईल, असा दावा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आला आहे. ई-रुपीद्वारे डिजिटल पेमेंट करण्यासाठी डिजिटल कोड म्हणजे क्यूआर कोड कोणाच्याही मोबाईलवर पाठवता येईल. हा क्यूआर कोड वापरुन पेमेंट करता येणार आहे. यासाठी मोबाईल अॅपची गरज नाही, इंटरनेटचीही आवश्यकता नाही. एसएमएसच्या साहाय्याने तुम्ही पेमेंट करु शकता. कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस मोबाईल व्यवहार करण्यासाठी ई-रुपी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे. एकप्रकारे हे प्रिपेड व्हाऊचर आहे.

व्यक्तींना थेटपणे सरकारी योजनांचा लाभ मिळवता येईल. बालकल्याण, टीबी निर्मूलन, आयुष्यमान भारत, पंतप्रधान आरोग्य योजना, खतांवर अनुदान या सरकारी योजनांसाठी ई-रुपी कार्डचा वापर केला जाऊ शकणार आहे. csr साठी ई-रुपीच्या डिजिटल व्हाऊचर्सचा वापर होऊ शकतो. ई-रुपेचा वापर करताना बँक डिटेलची गरज नाही, स्मार्टफोनची गरज नाही. त्यामुळे डिजिटल पेमेंटच्या दृष्टीने मोदी सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलं जातंय.

e-RUPI चे काही फायदे

१. e-RUPI कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट आहे

२. योजनेचा लाभ देणारे आणि लाभ घेणारे दोघांशी डिजिटली संपर्क करता येणार आहे

३. कल्याणकारी योजना थेटपणे कोणत्याही थर्ड पार्टीशिवाय लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत

४. यामध्ये क्यू-आर कोड किंवा एसएमएसच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे

५. कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप, इंटरनेटशिवाय पेमेंट करता येणार आहे

६. e-RUPI मानवी हस्तक्षेपाशिवाय सेवांचे प्रायोजन, लाभार्थी आणि सेवा पुरवणारे यांचा डिजिटली जोडले ठेवणार आहे

७. व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सेवा पुरवणाऱ्याला पेमेंट मिळणार आहे

८.e-RUPI प्री-पेड स्वरुपाचे आहे आणि वेळेवर पेमेंट व्यवहार होतो

९. बालकल्याण, टीबी निर्मूलन, आयुष्यमान भारत, पंतप्रधान आरोग्य योजना, खतांवर अनुदान या सरकारी योजनांसाठी ई-रुपी कार्डचा वापर केला जाऊ शकतो

१०. हे डिजिटल व्हाऊचर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही वापरता येणार आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi Will Launch A Digital Payment Platform Called E Rupi Benefits New Digital Payment Platform

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..