नरेंद्र मोदींनी दिल्या केजरीवालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

केजरीवाल यांच्या पन्नासाव्या वाढदिवशी त्यांना अनेक राजकारणी, मान्यवरांनी शुभच्छा दिल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केजरीवालांना शुभेच्छा दिल्या. तसेच अभिनेता रितेश देशमुख, संगीतकार विशाल दादलानी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.   

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आरोग्य लाभो.' अशा आशयाचे ट्विट मोदी यांनी केले. 

या ट्विटवर अरविंद केजरीवाल यांनीही मोदींचे 'धन्यवाद' मानले. केजरीवाल यांच्या पन्नासाव्या वाढदिवशी त्यांना अनेक राजकारणी, मान्यवरांनी शुभच्छा दिल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केजरीवालांना शुभेच्छा दिल्या. तसेच अभिनेता रितेश देशमुख, संगीतकार विशाल दादलानी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.   

केजरीवाल यांनी आपच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असल्याने, आज त्यांच्या वाढदिसानिमित्त जल्लोष करू नये. 

Web Title: prime minister narendra modi wish delhi chief minister arvinda kejariwal on their birthday