पंतप्रधान शुक्रवारी भारतातील सर्वांत मोठ्या ड्रोन महोत्सवाचा शुभारंभ करणार

Prime Minister will inaugurate the largest drone festival in India
Prime Minister will inaugurate the largest drone festival in IndiaPrime Minister will inaugurate the largest drone festival in India

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) शुक्रवारी (ता. २७) भारतातील सर्वांत मोठा ड्रोन महोत्सव - इंडिया ड्रोन महोत्सव (drone festival) २०२२ चे शुभारंभ करतील. शुक्रवारी सकाळी १० वाजता देशाच्या राजधानीतील प्रगती मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी शेतकरी ड्रोन पायलटशी चर्चा करतील. पंतप्रधान ड्रोन ऑपरेशनचे साक्षीदारही असतील. (Prime Minister will inaugurate the largest drone festival in India)

२७ मे पासून सुरू होणारा हा महोत्सव (drone festival) दोन दिवस चालणार आहे. पंतप्रधान (Narendra modi) शेतकरी ड्रोन चालकांशी संवाद साधतील. उघड्यावर ड्रोन चालवताना पाहतील. तसेच ड्रोन प्रदर्शन केंद्रात स्टार्टअपशी संवाद साधतील, असे निवेदनात म्हटले आहे.

Prime Minister will inaugurate the largest drone festival in India
हनिमूनवेळी पतीबद्दल समजली धक्कादायक गोष्ट; पत्नी पोहोचली पोलिस ठाण्यात

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता आणि आवाहन केले होते की लोकांसाठी या क्षेत्राबद्दल जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे.

सरकारी अधिकारी, परदेशी मुत्सद्दी, सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, खाजगी कंपन्या आणि ड्रोन स्टार्टअपमधील १,६०० हून अधिक लोक सहभागी होतील. प्रदर्शनात ७० हून अधिक प्रदर्शक ड्रोनच्या विविध उपयोगांची माहिती देतील. महोत्सवात ड्रोन पायलट प्रमाणपत्रांचे डिजिटल वितरण, उत्पादनांचे लाँचिंग, पॅनेल चर्चा, ऑपरेशनल डिस्प्ले आणि मेड इन इंडिया ड्रोन टॅक्सीची प्रतिकृती दिसेल, असे निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com