पंतप्रधानांचा नॉन स्टॉप अमेरिका प्रवास

फ्रँकफर्टला थांबण्याची गरज नाही; पाकिस्तानच्या हद्दीचा वापर
PM Modi
PM Modi sakal

नवी दिल्ली (पीटीआय): पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी एअर इंडिया वन विमानातून नॉन स्टॉप प्रवास करत अमेरिकेत पोचले. विनाथांबा प्रवासाने अनेक दशकांपासून असलेली परंपरा मोडीत निघाली आहे.अनेक वर्षांपासून अमेरिकेला जाणारे भारताचे पंतप्रधान जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात थांबत असत आणि तेथून अमेरिकेकडे प्रयाण करत असत. परंतु यंदा असे घडले नाही. पंतप्रधान मोदी हे कोठेही न थांबता थेट न्यूयॉर्कला १३ तासाच्या दीर्घ प्रवास करत उतरले. या प्रवासाचे संपूर्ण श्रेय अत्याधुनिक एअर इंडिया वन विमानाकडे जाते. हे विमान नुकतेच एअर इंडियाच्या ताफ्यात सामील झाले आहे.

पंतप्रधान मोदी हे क्वाड शिखर परिषद आणि संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी न्यूयॉर्कला पोचले आहेत. भारताच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी तयार केलेले विमान एअर इंडिया वन राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांच्या सेवेत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यांत या विमानाचा एअर इंडियाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. या विमानासाठी सुमारे ४५०० कोटी रुपये खर्च आला आहे. या विमानाचे वैशिष्ट्ये म्हणजे लांब पल्ल्याचा प्रवास हा कोठेही न थांबता पूर्ण करत येतो. यासाठी हवेतच तेल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

PM Modi
PM मोदींचा अमेरिका दौरा; पहिल्याच दिवशी उद्योगपतींशी चर्चा

जर्मनीच्या थांब्याला आता फुलस्टॉप

आतापर्यंत तेल भरण्यासाठी विमान फ्रँकफर्ट विमानतळावर थांबवले जात असत. त्यानंतर हे विमान अमेरिकेला रवाना होत असे. पंतप्रधान मोदी हे २०१९ च्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्यादरम्यान फ्रँकफर्टला थांबले होते. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देखील फ्रँकफर्टला काही तास थांबून ते अमेरिकेला जात.

पाकिस्तानच्या हद्दीचा वापर

एअर इंडिया वन हे काल पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करून अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीला टाळत इराणमार्गे अमेरिकेला रवाना झाले. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील श्रीलंकेला जाताना भारतीय हवाई हद्दीचा वापर केला होता. मोदींनी दुसऱ्यांदा एअर इंडिया वनने प्रवास केला आहे. यापूर्वी ते बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते.

अभेद्य एअर इंडिया वन

एअर इंडिया वन हे ९०० किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण करते. सर्वात सुरक्षित असणारे विमानाच्या पुढील भागात जॅमर असून ते शत्रूचे सिग्नल निष्प्रभ करते. या विमानावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा परिणाम होत नाही. हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता या विमानात आहे. बी-७७७ विमानातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा असून त्यास लार्ज एअरक्राफ्ट इंफ्रारेड काउंटरमेजर्स आणि सेल्फ प्रोटेक्शन सूटस असे म्हटले जाते.
अमेरिकेने सुमारे १९ कोटी डॉलरच्या बदल्यात ही सुरक्षा यंत्रणा भारताला दिली. कोणताही हल्ला परतावून लावण्याची क्षमता या विमानात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com