Mallikarjun Kharge : पंतप्रधान कार्यालयाच्या प्रतिष्ठेची उणीव जाणवते; डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल खर्गे यांची कृतज्ञता

यानिमित्त काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पत्र लिहून डॉ. सिंग यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मल्लिकार्जुन खर्गे
मल्लिकार्जुन खर्गेesakal

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिलेली प्रतिष्ठेची उणीव सध्या जाणवत असल्याचे मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले आहे. डॉ. मनमोहन सिंग हे ३३ वर्षांच्या सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले आहेत. त्यांची राज्यसभेची मुदत दोन एप्रिलला संपली. यानिमित्त काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पत्र लिहून डॉ. सिंग यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मल्लिकार्जुन खर्गे
Mental Health: तुमच्या 'या' सवयी मानसिक आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

‘आपण राबविलेले आर्थिक धोरणे मोठे व तरुण उद्योजक, छोटे व्यापारी, गरीब व नोकरदार वर्गांना सारखेच फायदेशीर ठरले,’ असे नमूद करून या पत्रात म्हटले आहे, ‘‘सामान्य व्यक्तीसुद्धा देशाच्या उभारणीत योगदान देऊ शकतो, हे तुमच्या धोरणामुळे दिसून आले. यामुळेच देशातील २७ कोटी जनता दारिद्र्यरेषेखाली बाहेर येऊ शकली. आपण सुरू केलेली ‘मनरेगा’ योजना आजही असंघटित व अकुशल कामगारांना उत्पन्नाचे ठोस ठरली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे
Avocados Health Benefits: अॅव्होकाडोमध्ये लपलंय आरोग्याचा खजिना

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी तुमच्या गौरवार्थ म्हणाले होते की, डॉ. मनमोहन सिंग जेव्हा बोलतात, तेव्हा सर्व जग त्यांना ऐकते. परंतु तुमच्यावर नंतरच्या काळात व्यक्तिगत पातळीवर हल्ले झाले. तुम्ही मोठ्या मनाने त्यांच्याबद्दल मनात कोणतीही अढी ठेवली नाही. ज्या काही सुधारणा विद्यमान सरकारने केल्या आहेत, त्याचे मूळ आपण रोवलेल्या धोरणांमध्ये आहे. तुम्ही पंतप्रधान कार्यालयाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. या प्रतिष्ठेची उणीव सध्या देशाला जाणवत आहे.

मध्यमवर्गीयांसाठी आदर्श

खर्गे म्हणाले की, भारतीय संसदेला तुमची बुद्धिमत्ता व अनुभवाची नक्कीच उणीव जाणवेल. सध्याच्या संसदेत मोठ्या आवाजातील खोटी वक्तव्ये व आपण केलेली सौम्य, प्रतिष्ठित व माफक शब्द हे विरोधाभासी वाटतात. तुम्ही नेहमीच मध्यमवर्गीय व आकांक्षी युवांसाठी एक आदर्श म्हणून राहाल, असेही खर्गे यांनी या पत्रात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com