Article 370 : काश्मीरमध्ये उद्योग उभारण्यास प्राधान्य : पंतप्रधान

टीम ई-सकाळ
Thursday, 8 August 2019

काश्मीरमधील जनता आता नव्या विश्वासाने पुढे जाईल. येथील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग उभारणीस प्राधान्य दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : काश्मीरमधील जनता आता नव्या विश्वासाने पुढे जाईल. येथील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग उभारणीस प्राधान्य दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले, की आता काश्मीरमधील युवकच येथील विकासाची दोरी आपल्या हातात घेतील. देशातील सर्वांत प्रगत राज्य बनण्याची क्षमता येथे आहे. प्रशासनात हवा असलेला बदल येथे केला जात आहे. बॉलिवूडची चित्रीकरणाची काश्मीर ही पसंती होती. पण, आता मोजक्याच चित्रपटांचे चित्रीकरण येथे केले जाते. आता या निर्णयामुळे येथील वातावरण पुन्हा बदलणार आहे. त्यामुळे माझे आवाहन आहे, की हिंदीसह भारतातील व परदेशातील चित्रपटसृष्टीने काश्मीरमध्ये यावे. काश्मीरमध्ये तंत्रज्ञानाचा विस्तार केला जाईल, याकडे लक्ष देवू. तंत्रज्ञानाचा विस्तार झाल्यानंतर येथील नागरिकांचे जीवन सुकर होणार आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर काश्मीर केंद्रशासित प्रदेश नसेल. काश्मीरला स्वतंत्र राज्य बनवू.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर काश्मीरमधील हे कलम हटविण्यात आले आहे.

जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत. देशभरात सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. मोदींनी याविषयी प्रथमच सार्वजनिक भाषण करत देशाला उद्देशून भाषण केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priority for setting up industry in Kashmir says PM Modi