
कलबुर्गी मध्यवर्ती कारागृहाचे जड दरवाजे उघडले तेव्हा ६८ वर्षीय दुर्गाप्पा बाहेर पडले. पण त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागली आणि तीही १ लाख १ हजार रुपयांची. खून प्रकरणातील दोषी दुर्गाप्पा नोव्हेंबर २०२४ मध्ये सुटणार होता. पण न्यायालयाने ठोठावलेल्या दंडामुळे त्याची सुटका होण्यास अडथळा निर्माण झाला.