

Prithviraj Chavan
esakal
Pune: लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेला काँग्रेसचा विरोध नाही; मात्र या प्रक्रियेमुळे राज्यांच्या प्रतिनिधित्वातील सध्याचे प्रमाण बदलता कामा नये, अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे. लोकसभेतील राज्यनिहाय जागांचे प्रमाण १९७१ च्या जनगणनेनुसारच कायम ठेवावे, अशी मागणी करतानाच, लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावालाही विरोध असल्याचे चव्हाण म्हणाले.