'इंधन करातून मोदी सरकारने कमविले 23 लाख कोटी'

Prithviraj Chavan
Prithviraj Chavanesakal
Summary

केंद्र सरकारने काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या करातून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले आहेत.

कऱ्हाड (सातारा) : पोटनिवडणुकीत झालेल्या दारूण पराभवातून बोध घेऊन केंद्रातील भाजप सरकारने (BJP government) पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price Hike) भाव कमी करण्याचा निर्णय घेतला. मुळात भरमसाठ करवाढ करून मोदी सरकारने (Modi government) पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीतून 23 लाख कोटी रूपये कमविले आहेत. आता आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांत फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकार इंधनदरात कपातीची मलमट्टी करत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केंद्र सरकारवर केलीय.

केंद्र सरकारने काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या करातून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले. आता हेच पैसे किसान सन्मान व इतर गोष्टींकरता वापरले जात आहेत. नागरिकांच्या खिशातून एका बाजूने पैसे काढून दुसरीकडे तेच पैसे देताना आम्ही पैसे दिल्याचा आव सरकार आव आणत आहे. अनेक दिवसांपासून होत असलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ दिवाळीच्या तोंडावर बुधवारी थांबली होती. यापूर्वी पेट्रोलच्या दरात सलग 7 दिवस तर डिझेलच्या दरात सहा दिवस 35-35 पैशांची वाढ करण्यात आली होती.

Prithviraj Chavan
महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

मंगळवारी पेट्रोलच्या किमतीत 35 पैशांची वाढ करण्यात आली होती. परंतु, डिझेलच्या किमतीत वाढ झाली नव्हती. दिल्लीत बुधवारी पेट्रोलचे दर 110.04 रूपये तर डिझेलचे दर 98.42 रूपये प्रति लिटर इतके होते. गुरूवारी मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 115.85 रुपयावर स्थिर होता. तर दिल्लीत पेट्रोल 110.04 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 106.66 रुपये, कोलकात्यात एक 110.49 रुपये तर भोपाळमध्ये काल पेट्रोलचे दर 118.83 रुपये इतके होते. तर दुसरीकडे मुंबईत डिझेलचा दर 106.62 रुपये इतका होता.

Prithviraj Chavan
त्रिपुरातून भाजपसाठी आनंदाची बातमी; 20 पैकी 7 जागांवर बिनविरोध विजय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com