Balasaheb Patil
Balasaheb Patilesakal

महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

Summary

महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्री संचालक होण्यासाठी रिंगणात उतरलेले आहेत.

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यावेळच्या निवडणुकीत (Satara Bank Election) सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये कऱ्हाड सोसायटीत ॲड. उदयसिंह पाटील (Udaysingh Patil) यांनी सहकारमंत्र्यांपुढे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी पायाला भिंगरी लावून हा सोसायटी मतदारसंघ पिंजून काढत मतदारांशी प्रत्यक्ष संपर्कावर भर दिला आहे, तर पाटण सोसायटीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (Vikramsingh Patankar) व सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsingh Patankar) यांना रोखण्यासाठी व दगा फटका टाळण्यासाठी गृह राज्यमंत्र्यांनी आपल्या विचाराचे मतदार सुरक्षितस्थळी रवाना केले आहेत. त्यामुळे या दोन मतदारसंघांत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काय चित्र राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Balasaheb Patil
पोटनिवडणुकीच्या निकालाचा भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांना झटका

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यावेळेस महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) दोन मंत्री संचालक होण्यासाठी रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे बँकेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कऱ्हाड विकास सेवा सोसायटीतून, तर शिवसेनेचे नेते व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई हे पाटण सोसायटी मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. सहकारमंत्र्यांना विलासकाका उंडाळकरांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांनी आव्हान दिले असून, पाटणमधून विद्यमान संचालक विक्रमसिंह पाटणकर व त्यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांना रोखण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी रिंगणात उतरत आव्हान निर्माण केलेले आहे.

Balasaheb Patil
'गोवा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीती आखणार'

यापूर्वीच्या निवडणुकीत शंभूराज देसाई यांना जिल्हा बँकेवर संचालक म्हणून घेण्याबाबतचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेला होता; पण तो पाळला गेला नाही. त्याचा राग मंत्री देसाई यांना आहे, तर कऱ्हाडात विलासराव पाटील उंडाळकर यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील यांना बँकेत संचालक म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घ्यावे, असा सूर निघाला आहे; पण त्याला सहकारमंत्र्यांनी अडविले आहे. कऱ्हाड सोसायटीऐवजी बँका, पतसंस्थेतून निवडणूक लढावी, अशी सूचना राष्ट्रवादीकडून उदयसिंह पाटलांना केली होती. मात्र, त्यांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही. कऱ्हाड सोसायटीमध्ये सहकारमंत्री, उदयसिंह पाटील यांच्यात अतुल भोसले यांची मते कोणाला मिळणार यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत. येथे भाजपकडून सहकारमंत्र्यांना अडचणीत आणण्याची खेळी डॉ. अतुल भोसलेंच्या माध्यमातून खेळली जाऊ शकते किंवा ते सहकारमंत्र्यांनाही मदत करू शकतात. त्यांच्या भूमिकेवर येथील गणिते अवलंबून आहेत. ऐनवेळी उदयसिंह पाटील यांना आमदार करण्याचे आश्वासन देऊन त्यांचा अर्ज मागे घेण्यापर्यंतचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांकडून होऊ शकतात.

Balasaheb Patil
निवडणुकीत होणार दहा लाखांचा चुराडा; उमेदवाराला दोन लाखांची मर्यादा

पाटण मतदारसंघात पाटणकर पितापुत्रांपैकी कोणाचा अर्ज ठेवायचा हे अद्यापपर्यंत निश्चित झालेले नाही. परिणामी गृह राज्यमंत्र्यांनी अर्ज दाखल केलेला असल्याने या दोघांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर मंत्री देसाई यांनी ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून आपल्या विचारांचे मतदार सुरक्षितस्थळी हलविले आहेत. त्यामुळे पाटण सोसायटीत पाटणकर विरुद्ध देसाई हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. यावेळेस शंभूराज देसाई यांची मनधरणीही राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्यात अद्यापपर्यंत यश आलेले नाही. त्यामुळे कऱ्हाड आणि पाटण सोसायटीतून महाविकासच्या दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.

  • कऱ्हाड सोसायटी मतदार : 140

  • पाटण सोसायटी मतदार : 103

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com