Mahua Moitra: महुआ मोइत्रांच्या निलंबनावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया; म्हणाले, यामागचं राजकारण...

तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर आज बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan
Updated on

नवी दिल्ली : तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर आज संसदेतून बडतर्फीची कारवाई करण्यात आली. सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे त्यांच्यावर आरोप होते. या आरोपांवर एथिक्स कमिटीनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस केली आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी ही शिफारस स्विकारत मोइत्रांचं सदस्यत्व रद्द केलं.

मोइत्रांच्या या कारवाईवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कडवी प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईमागं राजकारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याची माहितीही त्यांनी दिली. (Prithviraj Chavan reaction on expel of TMC MP Mahua Moitra from Parliament)

प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महुआ मोइत्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल याचा अंदाज तर होताच. मनानेच रचलेल्या गोष्टीतून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी पैसे घेतले अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले.

मोइत्रांचा आपल्या बिझनेस पार्टनरशी वाद झाला होता त्यामुळं त्यांनी मोइत्रांवर आरोप केले आणि तक्रार दाखल केली. त्यांना मोइत्रांची बदनामी करण्यात रस होता. तसेच दुसरी व्यक्ती आहे जी एक बिझनेसमन असून दुबईत राहते. या व्यक्तीनं हे सांगितलं की, मोइत्रांनी माझ्यासोबत त्यांचा संसदेचा आयडी शेअर केला होता. (Latest Marathi News)

Prithviraj Chavan
UPSC Main Exam Results: युपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

उलट तपासणी करुच दिली नाही

विरोधीपक्षाच्या नात्यानं जेव्हा आम्ही सरकारविरोधात कोणताही भ्रष्टाचार शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेक लोकांची मदत घ्यावी लागते. कारण आमच्याजवळ कुठली तपास यंत्रणा नसते. पण सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. यासाठी आम्ही अनेक लोकांकडून माहिती घेत असतो अशाच प्रकारे मोइत्रांनी त्यांच्याकडून माहिती घेतली असेल. (Marathi Tajya Batmya)

यासाठी त्यांनी आपला ईमेल आयडी शेअर केला असेल, हे त्यांनी मान्य केलं आहे. पण या बदल्यात त्यांनी पैसे घेतले का? हे कमिटीच्या समोर आलंय का? दुबईत राहणारा बिझनेसमन जेव्हा दिल्लीला येत असतो तेव्हा तो एखादा स्कार्फ, दोन-चार लिपस्टिक घेऊन आला होता. पण याला काय लाच म्हटलं जाईल का? चला ते क्षणभर मानलं तरी.

मोईत्रांना त्या दोघांची उलट तपासणी घेण्याचाही अधिकार नाही का? कायद्यात नैसर्गिक न्याय पण हे सांगतो की जर कोणी आरोप केले किंवा साक्ष दिली तर त्याची उलट तपासणी केली जावी. तो म्हणतोय ते खरं आहे का? त्याचा यामागचा उद्देश काय आहे? हे तपासलं जावं. पण याची संधी मोइत्रांना देण्यात आली नाही. (Latest Marathi News)

Prithviraj Chavan
Aditya L1: सूर्य मोहिमेची मोठी कामगिरी! पहिल्यांदाच सूर्याची जवळून टिपली छायाचित्रे; मोहिमेचं पुण्याशी खास कनेक्शन
Prithviraj Chavan
200 Crore Cash: काँग्रेसच्या खासदारावर 'इन्कम टॅक्स'ची धाड; सापडली 200 कोटींची कॅश; PM मोदींच्या ट्विटची चर्चा

कारवाईचं मागचं सांगितलं कथित राजकारण

तसेच बहुमताच्या जोरावर एथिक्स कमिटीत जे भाजपचे खासदार होते त्यांनी मोइत्रांशी सविस्तर चर्चाही केली नाही. कारण त्या थोड्यावेळासाठी कमिटीसमोर हजर झाल्या कारण त्यांना चुकीच्या पद्धतीनं प्रश्न विचारले गेले. त्यानंतर कमिटीनं त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली, त्यानुसार लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई केली.

पण याच्यामागचं राजकारण काय आहे? जेव्हा कोणी अदानी समुहाबद्दल पंतप्रधानांना विचारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई होते. पहिल्यांदा राहुल गांधींनी प्रयत्न केला होता तर त्यांची खासदारकी रद्द केली पण कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना परत बहाल झाली. त्यानंतर आता महुआ मोइत्रा यांनी देखील तसेच प्रश्न विचारले तर त्यांचीही खासदारकी जबरदस्तीनं रद्द करण्यात आली.

हा संसदेच्या इतिहासातील काळा दिवस आहे. मी स्वतः १६ वर्षे संसदेची सेवा केली आहे. इतिहासात असं कधीही झालेलं नाही की जबरदस्तीनं एखाद्या खासदाराची सदस्यता रद्द करण्यात आली, असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com