शिक्षकाचं कर्तव्य विसरला, उर्दू शिकायला येणाऱ्या मुलीवर केला बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

शिक्षकाचं कर्तव्य विसरला, उर्दू शिकायला येणाऱ्या मुलीवर केला बलात्कार

जैसलमेर: विद्यार्थी आणि शिक्षक (Teacher) एक पवित्र नातं आहे. पण बदलत्या काळात शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराच्या (Rape) आरोपाखाली शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या (Rajasthan) कोटा जिल्ह्यातील (Kota district) कोटसुवा गावात ही घटना घडली आहे. विशेष कोर्टाने या प्रकरणात पॉस्को कायद्यातंर्गत आरोपी अब्दुल रहीमला (४३) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रहीम पीडीत मुलीली उर्दूमध्ये खासगी शिकवणी देत होता. स्थानिक मदरशाने दिलेल्या खोलीत तो राहत होता. रामपुरा कोटाचा तो निवासी आहे, असे पोलिसांनी सांगितले. पीडीत मुलीच्या पालकांनी रविवारी दिगोड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. शनिवारी दुपारी शिकवणी वर्ग झाल्यानंतर रहीमने पीडीत मुलगी वगळता अन्य मुलांना घरी जाण्यास सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: काशिफ खान वानखेडेंचा कलेक्टर आहे, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

त्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला. घरी आल्यानंतर पीडीत मुलीने तिच्यावर बरोबर घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीला लगेच अटक करण्यात आली. बलात्काराच्या ३७६ कलम आणि पॉस्को कायद्यातंर्गत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

loading image
go to top