काशिफ खान वानखेडेंचा कलेक्टर आहे, नवाब मलिकांचा गंभीर आरोप | Kashif khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kashif khan-nawab malik

काशिफ खान वानखेडेंचा कलेक्टर आहे, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई: राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) नवाब मलिक (Nawab malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मुंबई एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्यावर आरोप केले. "समीर वानखेडेंनी काशिफ खानवर (Kashif khan) कारवाई का नाही केली?" असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. "दिल्लीतील इन्फॉर्मरने काही फोटो पाठवले होते. काही नाव पाठवली होती. त्यात काशिफ खानचही नाव होतं"

"काशिफ खानचा फोटो के.पी. गोसावीला पाठवला होता. काशिफ खान बोटीतून क्रझवर गेला. तिथे काशिफ खानसोबत दुबईहून आलेली एक व्यक्ती होता. वानखेडेंनी त्यांना ताब्यात का घेतलं नाही" असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.

हेही वाचा: आज एक्स्प्रेस वे वर फायटर जेट्सच लँडिंग, मोदी येणार C-130 J मधून

"टीपच्या आधारवर वानखेडेंनी क्रूझवर लोकांना वेगळं केलं. मग काशिफ खानला का ताब्यात घेतलं नाही. व्हाईट दुबईबद्दल मी नंतर बोलीन. तो देशभरात ड्रग्जचा खेळ चालवतो" असे मलिक म्हणाले. "व्हाईट दुबई, काशिफ खानचा उल्लेख गोसावीच्या चॅटमध्ये आहे. दोन दिवस क्रूझवर ड्रग्ज पार्टी चालली. त्यांना सेफ पेसेज दिला" असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

हेही वाचा: ऐतिहासिक! भारतात समलैंगिक सौरभ कृपाल बनले न्यायाधीश

"काशिफ खान सोबत काय संबंध आहे? त्याचे वानखेडेंनी उत्तर द्यावे. काशिफ खानला ताब्यात का घेतलं नाही? गोव्यात ड्रग्ज टुरिजम मोठ्या प्रमाणावर चालते. काशिफ खान वानखेडेचा कलेक्टर आहे. गोव्याचा खेळ काशिफ खान माध्यमातून चालतो. त्याला का वाचवतला जातय?" असा नवाब मलिक यांचा प्रश्न आहे.

loading image
go to top