esakal | प्रियांका यांची हनुमान मंदिरात प्रार्थना
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi

प्रियांका यांची हनुमान मंदिरात प्रार्थना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रायबरेली - उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) दौऱ्यावर (Tour) आलेल्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी रविवारी लखनौ-रायबरेली मार्गावरील चुरुवा येथील हनुमान मंदिराला (Hanuman Temple) भेट देऊन प्रार्थना (Prayer) केली. याआधी राहुल गांधी यांनी शुक्रवारी जम्मूतील माता वैष्णोदेवी मंदिराला भेट दिली होती.

आई सोनिया यांच्या संसदीय मतदारसंघात प्रियांका दोन दिवस आहेत. हे मंदिर सिंहद्वार परिसरात आहे. प्रियांका येण्यापूर्वी शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मंदिरात गेल्यानंतर प्रियांका यांनी हनुमानाच्या मूर्तीसमोर मस्तक टेकवले. त्या सुमारे पाच मिनिटे मंदिरात होत्या. त्या प्रवेश करीत असताना प्रदेश चिटणीस सुशील कुमार आणि कार्यकर्ते सुनील तिवारी यांच्यात वादावादी झाली. ती वाढत असल्याचे पाहून जिल्हा अध्यक्ष राकेश सिंह यांनी दोघांना शांत केले. याविषयी ब्लॉक अध्यक्ष अवधेश चौधरी यांनी सांगितले की, चुरुवा येथे प्रियांका यांच्या स्वागताची जबाबदारी सुशील यांच्याकडे सोपविण्यात आली होती. वाद घातलेले सुनील तिवारी दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

हेही वाचा: काँग्रेसपेक्षा आम्ही सक्षम! ‘आप’ यूपीतील सर्व जागा लढविणार

सुनील तिवारी यांनी हरचंदपूर मतदारसंघातून पीस पार्टीच्या तिकिटावर २०१७ची निवडणूक लढविली होती. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रसार माध्यम समितीच्या सदस्य प्रियांका गुप्ता यांनी सांगितले की, प्रियांका वेगवेगळ्या बैठका घेतील, ज्या रात्रीपर्यंत चालतील. समाजाच्या विविध क्षेत्रांतील लोकांना त्या भेटतील.

ठिकठिकाणी स्वागत

प्रियांका यांनी बछरावा, हरचंदपूर, जगदीशपूर या खेड्यांसह सिव्हिल लाइन्स परिसराला भेट दिली. प्रत्येक ठिकाणी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

loading image
go to top