esakal | पंजाब रेजिमेंटचे सैनिक शेतकऱ्यांसोबत आंदोलनात? VIRAL व्हिडिओवर लष्कराचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

farmers protest

एका तंबूमध्ये लष्कराचे जवान नागरिकांसोबत उभा आहेत. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पंजाब रेजिमेंटचे सैनिक शेतकऱ्यांसोबत आंदोलनात? लष्कराचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. केंद्राने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील या आंदोलनात आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या आहेत. लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशसह देशातील राजकीय वातावऱण तापलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात भारतीय लष्करातील जवान शेतकऱ्यांसोबत दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल होत असताना सोबत असाही दावा केला जात आहे की, पंजाब रेजिमेंटचे जवान हे शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओबाबत केला जाणारा दावा भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. एका तंबूमध्ये लष्कराचे जवान नागरिकांसोबत उभा आहेत. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसंच दावा केला जातोय की, ते पंजाब रेजिमेंटचे सैनिक असून काही शेतकऱ्यांसोबत आंदोलन करत आहेत. मात्र हे पूर्णपणे खोटं आहे असं भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: लखीमपूर : हिंदू विरुद्ध शीख युद्ध पेटवण्याचा प्रयत्न - वरुण गांधी

सर्वसामान्य नागरिकांसोबत जवान काय करतायत या प्रश्नावर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, निवृत्त सैनिकांने लष्करातील सैनिकांना चहा दिला होता. सैनिकांचा गट दुसऱ्या एका ठिकाणी जात असताना या चहापानाच्या कार्यक्रमाचे आय़ोजन निवृत्त सैनिकाकडून करण्यात आले होते अशी माहिती लष्कराने दिली आहे.

loading image
go to top