esakal | मुदतीआधीच प्रियांका गांधींनी सोडला बंगला
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka_Gandhi.jpg

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा केला आहे. विशेष म्हणजे प्रियांका यांनी लोधी इस्टेट बंगला  केंद्र  सरकारकडून देण्यात आलेली अंतिम मुदत संपण्याआधीच रिकामा केला आहे.

मुदतीआधीच प्रियांका गांधींनी सोडला बंगला

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली- काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा केला आहे. विशेष म्हणजे प्रियांका यांनी लोधी इस्टेट बंगला  केंद्र  सरकारकडून देण्यात आलेली अंतिम मुदत संपण्याआधीच रिकामा केला आहे. केंद्र सरकारने 1 जूलै रोजी काढण्यात आलेल्या नोटीसीत  1 ऑगस्टपर्यंत बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी काही दिवस गुरुग्राममधील पेंटहाऊसमध्ये थांबणार आहेत. त्यानंतर त्या आपल्या मध्य दिल्लीतील नवीन घरी जाणार असल्याचं पीटीआयने त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली आहे.  

50 खून केल्यानंतर मोजायचं बंद केलं; डॉक्टरचा खळबळजनक कबुलीजबाब
जूलै महिन्याच्या सुरुवातीला गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने प्रियांका गांधी यांना लोधी इस्टेटमधील बंगला 35 रिकामा करण्याचे निर्देश दिले होते. प्रियांका गांधी याठिकाणी 1997 पासून राहत होत्या. त्यांना असणारी विशेष सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांना यापूर्वी एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती, आता त्यांना z+ सुरक्षा असणार आहे. मंत्रालयाने 1 जूलै 2020 रोजी नोटीस काढून एका महिन्याच्या आता बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले होते. 

केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली होती. प्रियांकी गांधी उत्तर प्रदेशातील योगी सरकारला वारंवार टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

भारतातच नाही तर अमेरिकेतही 'जय श्रीराम'; टाईम स्क्वेअरवर झळकणार...
काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या हरदीप सिंग पूरी यांनी ट्विट करत प्रियांका गांधी यांनी त्यांना फोन केल्याचं म्हटलं होतं. गांधी यांनी बंगला रिकामा करण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे किंवा लोधी बंगला काँग्रेस खासदाराला देण्याची विनंती केली असल्याचा दावा त्यांनी केला होता. प्रियांका गांधी यांनी हा दावा फेटाळून लावला होता. मी कोणालाही फोन केला नसून 1 ऑगस्टपूर्वी बंगला रिकामा करणार असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

दरम्यान, भाजप खासदार अनील बलूनी यांना हा बंगला देण्यात आला आहे. प्रियांका गांधी यांनी बलूनी यांना काही दिवसांपूर्वी चहासाठी त्यांना घरी बोलावलं होतं. बलूनी यांनीही प्रियांका यांना परिवारासह त्यांच्या उत्तराखंडमधील घरी जेवण्यासाठी येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

(edited by-kartik pujari)