esakal | योगींच्या वक्तव्यानंतर प्रियंका गांधींनी पुन्हा उचलला झाडू!
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka-Gandhi

योगींच्या वक्तव्यानंतर प्रियंका गांधींनी पुन्हा उचलला झाडू!

sakal_logo
By
ओमकार वाबळे

उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी या ठिकाणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर हिंसाचार झाल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी पीडितांना भेटण्यासाठी रवाना झाल्या. मात्र त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी आडवलं, आणि जवळच्या सरकारी रेस्ट हाऊसवर त्यांची रवानगी केली. सरकारच्या परवानगीशिवाय त्या पीडितांना भेटायला जाऊ शकत नाहीत, असे सांगण्यात आले. यानंतर उत्तर प्रदेशात विरोधकांनी आखणी वातावरण गरम केलं.

दरम्यान, सितापूरच्या रेस्ट हाऊसवर झाडू मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. प्रियंका गांधी साफसफाई करत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर योगींनी यावर खोचक प्रतिक्रिया दिली होती. "काँग्रेस नेत्यांना तेवढंच करण्याच्या उपयोगाचं ठेवायची जनतेची इच्छा आहे. आणि जनतेने काँग्रेसला तेच करायला लावलं आहे. या लोकांना उपद्रव करणं आणि नकारात्मकता पसरवणं यापेक्षा दुसरं काम उरलेलं नाही",असं योगी म्हणाले होते. आता योगींनी केलेल्या या वक्तव्यावर प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत योगी आदित्यनाथांवर पुन्हा निशाणा साधला आहे.

असे बोलून योगींनी त्यांची जातीयवादी आणि दलित विरोधी भूमिका स्पष्ट केली आहे. हा देशातील नागरिकांचा अपमान असल्याचं प्रयंका गांधींनी म्हटलं.

loading image
go to top