esakal | गांधी घराण्याबाहेरील अध्यक्षाला बॉस मानायला प्रियांका गांधीही तयार
sakal

बोलून बातमी शोधा

congress

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

गांधी घराण्याबाहेरील अध्यक्षाला बॉस मानायला प्रियांका गांधीही तयार

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी ही गांधी घराण्यापलीकडे असावी, असे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात याचा उल्लेख केला नसला तरी काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी गांधी घराण्यातील कोणतीही व्यक्ती असून नये, असा दाखला देत प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींनी समर्थन केल्याचा दावा 'इंडिया टुमारो' या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आलाय. प्रदीप चिब्बर आणि हर्ष शाह लिखित पुस्तक 13 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आले. 

बेरोजगारीबाबत सीएमआयईचा महत्वाचा अहवाल; जुलैत ५० लाख नोकऱ्यांवर गदा

काँग्रेसचा भावी अध्यक्ष गांधी घराण्यातील नसला तरी ती व्यक्ती 'बॉस म्हणून मान्य असेल. पक्षा संदर्भातील निर्णय घेण्याचे त्यांना स्वातंत्र्य असेल. त्यांनी उत्तर प्रदेशमधून हटवून मला अंदमान निकोबारला पाठवले तरी तिकडे जायला तयार होईन, असे प्रियांका गांधींनी म्हटल्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.

टाटाला मागे टाकणारी Dream 11 कंपनी आहे तरी काय?

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी घेतलेल्या निर्णयानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधीच पुन्हा पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहेत. तेव्हापासूनच भावी काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील असावा, असे चर्चा रंगली होती. काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत यावर एकमत झाल्याचेही बोलले गेले. खुद्द राहुल गांधींनी यासंदर्भात भाष्य केले होते. पुढील अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरील असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. प्रियांगा गांधी देखील त्यांच्याशी सहमत असल्याचे समोर येत आहे.